नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये वाढत चाललेल्या समाज माध्यमांचे हिंसक व्यसन व आक्रमकतेबाबत चिंता ....

समाज माध्यमातील 'स्टेटस्' आणि ‘स्टोरी’वरून वाद: तरुणाचा खून, दोघे गंभीर

बीड, प्रतिनिधी : समाज माध्यमांवर एकमेकांविरोधात टाकलेल्या ‘स्टोरी’च्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद सोमवारी रात्री भीषण हाणामारीत परिवर्तित झाला. कड्याजवळील  रुईनालकोल (ता. आष्टी) येथे झालेल्या या घटनेत २० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

       पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुईनालकोल (ता. आष्टी) गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर सोमवारी रात्री दोन गट आमनेसामने आले. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर एकमेकांविरोधात टाकलेल्या ‘स्टेटस’ आणि ‘स्टोरी’वरून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांत वाद सुरू होता. हा वाद प्रत्यक्षात भिडल्याने परिस्थिती चिघळली.वाद वाढताच एका गटातील तरुणांनी धारदार शस्त्राने दुसऱ्या गटातील तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दीपक शिवाजी नालकोल (वय २०) हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.याच हल्ल्यातील अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

          घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. या प्रकरणी गुन्हा हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. समाज माध्यमांवरील किरकोळ वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये वाढत चाललेल्या समाज माध्यमांचे हिंसक व्यसन व आक्रमकतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.------------------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या