सर्व स्तरातून अभिनंदन......

 परळीसाठी अभिमानास्पद; रामरक्षा गोशाळेला महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ‘देशी गोवंश सन्मान’ पुरस्कार प्रदान




परळी वैजनाथ : प्रतिनिधी...

        पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य देशी गोवंश सन्मान’ योजनेंतर्गत रामरक्षा प्रतिष्ठान संचलित रामरक्षा गोशाळेला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

    परळी वैजनाथ येथे आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशी गोवंश संवर्धन, गोसेवा आणि संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यास पशुसंवर्धन विभाग सचिव डाॅ. एन. रामास्वामी, आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीण कुमार देवरे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा तसेच सदस्य सुनील सूर्यवंशी, उद्धव नेरकर, सनतकुमार गुप्ता आणि नितीन मार्कडेय उपस्थित होते. रामरक्षा गोशाळेचे संचालक रतन कोठारी यांनी मान्यवरांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.

आदर्श गोशाळा म्हणून ओळख

---------------------

    परळी वैजनाथ पंचक्रोशीत गेल्या अनेक वर्षांपासून रामरक्षा गोशाळा सेवाभाव, तळमळ आणि प्रामाणिकपणाने कार्यरत आहे. कोठारी परिवाराच्या पुढाकारातून गोसेवा म्हणून सुरू करण्यात आलेली ही गोशाळा आज राज्यातील अग्रगण्य गोशाळांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी मोठ्या संख्येने देशी गोधनाचे संगोपन केले जाते. गोधनाच्या आरोग्याची काळजी, शाश्वत गोपालन पद्धती, जनजागृती उपक्रम तसेच विविध संशोधनात्मक प्रयोग राबविण्यात येतात. परिसरात देशी गोवंश संवर्धनाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात संस्थेची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

परळीकरांसाठी अभिमानाची बाब

-------------------

     पशुसंवर्धन विभागाने राज्यस्तरीय पातळीवर या कार्याची दखल घेत सन्मान केल्याने परळीकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रामरक्षा गोशाळेला मिळालेला हा पुरस्कार परळी तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून, सर्व स्तरांतून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.गोसंवर्धन आणि शाश्वत शेतीपूरक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार