नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

पर्यावरण संवर्धन ही मिशन मोडमधील कृती व्हावी

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजा मुंडे यांची भेट




पर्यावरण संवर्धन ही मिशन मोडमधील कृती व्हावी

Environment : मुंबई, दि. १६ : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांची आज संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रमाच्या वातावरणीय बदल विभागाचे संचालक तथा जागतिक प्रमुख मार्टिन क्रुसे यांनी भेट घेऊन विविध विषयांवर व धोरणात्मक बाबींवर चर्चा केली. राज्यातील वाढते शहरीकरण आणि बदलत्या हवामानाचा विचार करता, पर्यावरण संवर्धन ही आता केवळ चर्चा न राहता ती एक 'मिशन मोड' मधील कृती असायला हवी असे श्रीमती मुंडे यांनी यावेळी बोलतांना नमूद केले. 

मुंबईतील शासकीय निवासस्थान रामटेक येथे संचालक मार्टिन क्रुसे यांच्यासोबत 'बीट द हिट' मोहिमेच्या तांत्रिक आणि धोरणात्मक अंमलबजावणीवर श्रीमती मुंडे यांनी सखोल चर्चा केली.  यावेळी संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रमाच्या कार्यक्रम व्यवस्थापन अधिकारी बेंजामिन हिकमन, कार्यक्रम व्यवस्थापन अधिकारी मनोजकुमार एम, राज्य वातावरणीय बदल कृती कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे,  वरिष्ठ सल्लागार प्राची मर्चंट यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जागतिक स्तरावरील अनुभवांची जोड देऊन महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेवर मात करण्यासाठी एक भक्कम आराखडा तयार करण्याबाबत या दोन्ही मान्यवरांमध्ये यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शीतकरण ही चैनीची नव्हे तर विकासाची मूलभूत गरज असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. शाश्वत शीतकरण सर्वांसाठी परवडणारे, ऊर्जा कार्यक्षम आणि शहरी पुनर्विकास व गृहनिर्माण आराखड्यात समाविष्ट असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्सर्जन वाढवणाऱ्या पारंपरिक विकासाऐवजी जिल्हास्तरीय कूलिंग प्रणाली, निष्क्रिय (पॅसिव्ह) डिझाइन पद्धती आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. 

उष्णतेच्या वाढत्या जागतिक संकटाकडे लक्ष वेधताना संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे हवामान बदल संचालक मार्टिन क्रुसे यांनीही मोठ्या प्रमाणावर राबवता येतील अशा व्यवहार्य उपाययोजनांची गरज अधोरेखित केली.

महाराष्ट्र शासनाचा ‘ बी कूल’ प्रकल्प शहर, परिसर आणि इमारत पातळीवरील शीतकरण उपायांना चालना देणार असून त्याला तांत्रिक कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची जोड मिळणार आहे. यासोबतच वैज्ञानिक नदी पुनरुज्जीवन, उपग्रहाधारित मिथेन निरीक्षण, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, दुग्ध व कृषी क्षेत्रासाठी अक्षय ऊर्जेवर आधारित कोल्ड चेन आणि हवामान-संवेदनशील शहरी प्रशासनावरही भर दिला जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

सध्या चार शहरांमध्ये ‘क्लायमेट अॅक्शन सेल’ कार्यान्वित झाले असून आणखी सहा शहरांमध्ये प्रक्रिया सुरू आहे. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या दृष्टीकोनातून पर्यावरणीय संरक्षण आर्थिक विकासाला बळ देणारे ठरेल, असा विश्वास मंत्री श्रीमती मुंडे यांनी व्यक्त केला.

#Pankajamunde 

#News 

#Environment NEWS 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या