इमेज
  जातीवाचक उल्लेख करून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; अट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाजोगाई घोलपवाडी ता.अंबाजोगाई येथे एका २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या घरी असताना आरोपी कैलास तुळशीराम पुरणे (रा. घोलपवाडी, ता. अंबाजोगाई) याने तिचा हात धरून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. उपस्थित नागरिकांना पाहून आरोपीने पीडितेच्या जातीचा उल्लेख करत शिवीगाळ केली. तसेच, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. या प्रकरणी पीडित तरुणीने बर्दापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसे...

काय घातले साकडे?....

 महाशिवरात्रीनिमित्त माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे  दर्शन




 परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...

     माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज महाशिवरात्री निमित्त पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले. यावेळी बीड जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द व जातीय सलोखा अबाधित रहावा, असे साकडे धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथ यांच्या चरणी घातले.

     बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची महाशिवरात्र पर्वणी भाविक भक्तांसाठी अपूर्व सोहळा असतो. या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक परळी वैजनाथ येथे दाखल झाले आहेत. दिवसभरात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले. राज्याचे माजी कृषिमंत्री व परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी महाशिवरात्रीनिमित्त आज प्रभु वैद्यनाथ त्याचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. दरवर्षी धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रभू वैद्यनाथ मंदिरात पुष्प सजावट व विद्युत रोषणाई करण्यात येते. यावर्षीही आकर्षक अशी विद्युत रोषणाई व पुष्प सजावट मंदिर परिसरात करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील जनतेचे कल्याण व्हावे, सुख-समृद्धी नांदावी, जातीय सलोखा अबाधित राहावा अशा प्रकारची प्रार्थना आपण महाशिवरात्रीच्या दर्शनावेळी केल्याचे दर्शनानंतर धनंजय मुंडे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या