परळी वैजनाथ येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

परळी वैजनाथ येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी


संत सेवालाल महाराज यांनी एकता, सदाचार आणि शिक्षणाचे महत्त्व रुजविले - माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

  संत सेवालाल महाराज यांनी समाजात एकता, सदाचार आणि शिक्षणाचे महत्त्व रुजविले. त्यांचे विचार आदर्श व जीवनाला प्रेरक असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैया धर्माधिकारी  यांनी केले. शहरातील संत सेवालाल महाराज चौकात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. बंजारा समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी प्रमुख उपस्थित होते.

           कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी सांगितले की,संत सेवालाल महाराज यांनी समाजात एकता, सदाचार आणि शिक्षणाचे महत्त्व रुजविले. बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. समाजाने त्यांच्या विचारांवर चालत एकजूट राखून प्रगतीचा मार्ग स्वीकारावा. संतांच्या विचारांचे आचरण केल्यास समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागतील आणि नव्या पिढीला योग्य दिशा मिळेल असे ते म्हणाले.मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव, मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार