नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

 परळीत लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू  ; २३ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

      जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना परळी वैजनाथ यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसापासून काळ्या फिती लावून आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केले आहे. २३ फेब्रुवारी पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी यांनी दिला आहे. तालुक्यातील विविध कार्यालयातील एकूण ३० लिपिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

           महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील लिपिक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून निषेध आंदोलनास सुरुवात केली आहे. लिपिक संवर्ग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारीत वेतनश्रेणी लागू करावी, पदोन्नती स्तर कमी करून पदनामात बदल करावा, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी, तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षायादीत असलेल्या सर्वांना न्याय द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. 

         कार्यालयात उपस्थिती लावून कार्यालयासमोर शांततापूर्ण मार्गाने घोषणाबाजी करणे, २० फेब्रुवारी २०२६ शासनाला दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करणे, दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत संपूर्ण कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. लिपिक बांधवांनी हे आंदोलन सनदशीर मार्गाने करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

      या आंदोलनामुळे पंचायत समिती, जलसंपदा व इतर कार्यलयाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासन आणि शासन यामध्ये समन्वय साधून लवकरात लवकर तोडगा निघेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत संपूर्ण कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या