राज्य बालनाट्य स्पर्धेत बेला नाटकाला द्वितीय पारितोषिक 

सहा वैयक्तीक बक्षीसे, उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून शेख आसीफ यांचा सन्मान 


परळीच्या भेल सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग 

परळी (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या २२ व्या राज्य बालनाटय स्पर्धेत  बेला  नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले असून या  नाटकाने  अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. या सह बेला नाटकातील कलावंतांना  सहा वैयक्तीक  बक्षीसे मिळाली आहे.

पहिल्यांदाच परळी येथील नाटकाला सात बक्षीस मिळाले आहे.छत्रपती सेवाभावी संस्थेच्या वतीने बेला नाटकाने संभाजीनगर विभागांतर्गत हे यश मिळविले आहे. या नाटकाचे उत्कृष्ट दिग्दर्शन आसीफ शेख यानी केले असुन बाल कलाकारांनी जबरदस्त मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवून दिले आहे. या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी आसीफ शेख यांना द्वितीय बक्षीस मिळाले तर संगीतसाठी अतुल साळवे यांना द्वितीय बक्षीस, वेशभूषेसाठी अनिल गोटमोकले यांना द्वितीय बक्षीस, प्रकाश योजनेसाठी  मानिकचंद थोरात यांनातृतीय बक्षीस, रंगभूषासाठी विश्रांत लशकारे यांना तृतीय बक्षीस मिळाले आहे. सारा गित्ते यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले. एकूण ४९ नाटकात या नाटकाने दुसरे स्थान मिळविले आहे. नाटकात  भेल सेकंडरी स्कूलचे कलाकार त्रिशा  यादव, सारा  गीत्ते, आयुष पीसे, वरद  चाटे, शिवम  चाटे, आर्यवर्धन  फड अजय  शिंदे, मयुरेश  खोत, प्रणव  चव्हाण,महेश  नागरगोजे, पार्थ  कासार,अर्जुन  भताने, अर्नव  मुंडे, वेदप्रकाश  कावरे, स्वरा  घुगे, ईश्वरी  शेळके, स्नेहल शेळके यांनी अभिनय केला. प्रकाश योजना माणिकचंद थोरात, संगीत अतुल साळवे,नेपथ्य शेख अकबर, रंगभूषा विश्रांत लशकारे, वेशभूषा अनिल गोटमोकलेरंगमंच व्यवस्था रोहिणी वाकडे, राहुल सुर्यवंशी यांनी केले.या यशाबद्दल भेल शाळेचे प्राचार्य गीरीष ठाकुर यासह शिक्षक व पालकांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार