प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 परळीतील कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालयास स्व.अजित पवार यांचे नाव द्या– दीपक देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी





परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी वैजनाथ येथे सुरू होऊ घातलेल्या कृषी महाविद्यालय व पशुवैद्यकीय महाविद्यालयास स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चे नेते माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी  मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सादर निवेदनात देशमुख यांनी नमूद केले आहे की, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्य करताना त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली. शेती, सिंचन, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्ह्यात विकासाची नवी दिशा निर्माण झाली.

परळी वैजनाथ येथे उभारण्यात येणारी कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालये ही शेतकरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. या शैक्षणिक संस्थांमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून कृषी व पशुसंवर्धन क्षेत्राला चालना मिळणार आहे. अशा या महत्त्वाच्या संस्थांना स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात आल्यास त्यांच्या कार्याला योग्य असा सन्मान मिळेल आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान निर्माण होईल, असेही देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या