कृषी प्रदर्शन व पशुसंवर्धन मेळावे घेऊन शेतकऱ्याचे भले होणार नाही नुकसान भरपाई संदर्भात तात्काळ नवीन कायदा करून अंमलबजावणी करा ?– वसंत मुंडे 





परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील त्रिमूर्ती सरकारने शेतकऱ्यासाठी  शेतीमाला संदर्भात किमान आधारभूत किंमत, पिक विमा व बोगस खते बी बियाणे कीटकनाशके औषधे संदर्भात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कायद्यात तरतूद करून तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे.

        शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना असल्या तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारे लोकप्रतिनिधी संबंधित खात्याचे कर्मचारी व अधिकारी, मंत्री कार्यालयात टक्केवारी घेतल्या शिवाय कामांना मंजुरी मिळत नाही  असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे नी केला . पशुसंवर्धन व कृषी प्रदर्शन मेळावे राज्यात विविध ठिकाणी चालू आहेत परंतु जनतेच्या टॅक्स मधून जो पैसा शासनाला मिळतो त्याचा दुरुपयोग प्रदर्शने, मेळावे व बोगस योजना दाखवून संबंधित प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी मंत्री कार्यालयात टक्केवारी घेऊन पैसे हडप करतात त्यातून जनतेच्या हिताच्या योजनाची अंमलबजावणी नियमानुसार होत नाही. शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान नवीन खते बी बियाणे औषधी कीटकनाशके,  आधुनिक शेती अवजारे, शेतीशी निगडीत नवीन प्रयोग व पशुसंवर्धना संदर्भात नवीन सरकारच्या योजनाची माहिती जनतेपर्यंत प्रसार माध्यमाद्वारे व विविध विभागामार्फत प्रत्यक्षात दिली पाहिजे परंतु जनतेचे पैसे खर्च करण्याकरता हे मेळाव्याचे आयोजन केले जाते असा गंभीर आरोप काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केली  .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार