प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 चार श्रमसंहिता रद्द करा, मागणीसाठी परळीत सिटू कामगारांचा धडकला  तहसीलवर भव्य मोर्चा




 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      चार श्रमसंहिता रद्द करा यासह अन्य कामगार क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आज परळी तहसील कार्यालयावर सिटू कामगारांचा भव्य दिव्य मोर्चा धडकला. कामगार विरोधी धोरण रद्द करा, खाजगीकरण रद्द करा, चार श्रम संहिता रद्द करा अशा प्रकारची मागणी सिटू कामगार मोर्चेकर्‍यांनी शासनाकडे केली.

  केंद्र सरकारने कामगार विरोधी भांडवलदार धार्जिन्या चार श्रमसंहिता लागू केलेल्या आहेत. कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा या प्रमुख मागणीसाठी परळी सिटू कामगार संघटनेने परळी तहसीलवर मोर्चा काढला होता. परळीतील सिटू कार्यालयापासून हा मोर्चा टावर- मोंढा- बस स्टॅन्ड मार्गे तहसीलवर पोहोचला. चार श्रमसंहिता रद्द करा, आशा वर्कर्सना कायम करा, शालेय पोषण आहार कामगारांना कायम करा, आजी- आजोबांना दहा हजार रुपये पेन्शन द्या, कंत्राटीकरण थांबवा,  खाजगी धंद्यात आरक्षण लागू करा, घर कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती द्या, घर कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन द्या, शालेय पोषण आहार कामगारांना किमान वेतन तीस हजार रुपये द्या आदी घोषणांनी परळी शहर कामगारांनी दणाणून सोडले. मोर्चा तहसीलवर धडकल्यानंतर या ठिकाणी पांडुरंग राठोड, कॉ. पी.एस. घाडगे, कॉ. प्रभाकर नागरगोजे, बांधकाम कामगार नेते प्रकाश वाघमारे, शेख जावेद, नवीद मौजन यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे बीड जिल्हा सिटू चे अध्यक्ष प्रा. बी.जी. खाडे यांनी कामगारांना सविस्तर मार्गदर्शन केले व शासनाचे धोरण कामगार विरोधी असून सातत्याने लढा लढला पाहिजे असे आवाहन केले. यावेळी कॉ. किरण सावजी, सुवर्णा रेवले, अशा लांडगे, हेमा काळे, शेख जावेद, रमेश पांचाळ, यमुना पाथरकर यांच्या शिष्टमंडळाने तहसीलच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी जालिंदर गिरी, आशा लांडगे, अनिता गिराम,  शेख फिरोज, बाबासाहेब रोडे, संजय कसबे, संदेश सरवदे, मीरा ताटे, रमेश पांचाळ, प्रकाश चव्हाण, परमेश्वर गीते, अरुण पांचाळ आदींनी मेहनत घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या