भाविकांना खिचडीचे वाटप..

 ना.पंकजा मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन 




परळी वैजनाथ दि. १५..  

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. 

प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज महाशिवरात्री निमित्त राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेतले. वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष व तहसीलदार व्यंकटेश मुंडे, विश्वस्त राजेश देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. 

भाविकांना खिचडीचे वाटप

भाविकांना उपवासाची खिचडी मोफत वाटप करण्यासाठी परळी नगरपरिषदेने उभारलेल्या स्टॉलला  ना. पंकजा मुंडे यांनी भेट दिली, त्यांच्या हस्ते दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार