भक्ती गीत कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन

 महाशिवरात्री महोत्सव: आज प्रभु वैद्यनाथाचा पालखी सोहळा;सुप्रसिद्ध गायिका विदुषी मंजुषा पाटील (पुणे) यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्री महापर्वा निमित्त देवल कमिटीच्या वतीने तीन दिवस महोत्सव साजरा केला जातो. या तीन दिवशीय महोत्सवाची सांगता आज दिनांक प्रभु वैद्यनाथाच्या पालखी सोहळ्याने होणार आहे. या निमित्ताने सुप्रसिद्ध गायिका विदुषी मंजुषा पाटील पुणे यांचा भक्ती गीताचा कार्यक्रम पालखी समोर सादर होणार आहे.

श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट, परळी वैजनाथ महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमित्त सुप्रसिद्ध गायिका विदुषी मंजुषा पाटील (पुणे) यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम मंगळवार, दि.१७ फेब्रुवारी २०२६ वेळ :सायं. ६:०० वाजता परळी वैजनाथ देशमुखपार समोर, होणार आहे. भाविक भक्तांनी, रसिकांनी या गीत गायन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यंकटेश मुंडे(अध्यक्ष तथा तहसिलदार, परळी वैजनाथ),बाबासाहेब देशमुख (सेक्रेटरी) व सर्व विश्वस्त श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ. यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार