नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

दारू आणि ‘कला केंद्रा’च्या नादात औषध विक्रेत्याचा मृत्यू; पाच मित्रांविरुद्ध गुन्हा

बीड, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील ३७ वर्षीय औषध विक्रेता सतीश भागवतराव मुंडे यांचा मित्रांकडून झालेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         मिळालेल्या माहितीनुसार, सतीश मुंडे हे १२ फेब्रुवारी रोजी मित्रांसोबत धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील ‘महाकाली कला केंद्रा’त कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. ते शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी यांच्या स्विफ्ट डिझायर कारमधून रवाना झाले. प्रवासादरम्यान साळेगाव येथील बार तसेच कळंब व येरमाळा परिसरातील धाब्यावर दारूचे सेवन करण्यात आल्याचे समोर आले आहे.रात्री सुमारे १२.१५ वाजेपर्यंत ते कला केंद्रात होते. त्यानंतर १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री गावाकडे परतत असताना दुसऱ्या वाहनातील ओळखीच्या तरुणांनी गाडी अडवून जुन्या वादातून सतीश मुंडे यांना छाती व पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

        घटनेनंतर चालकाने सतीश मुंडे यांना रात्री सुमारे १ वाजता त्यांच्या घरी आणून ‘अत्याधिक मद्यपानामुळे बेशुद्ध पडले’ असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी त्यांना प्रथम केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सतीश मुंडे यांचे वडील भागवत बळीराम मुंडे यांच्या फिर्यादीवरून शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्दन गित्ते आणि दत्ता बाबासाहेब तोंडे (सर्व रा. साळेगाव, ता. केज) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, १९१(२), ११५(२) अन्वये खुनाचा गुन्हा (गु.र.नं. ३८/२०२६) दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे करीत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या