अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

अवकाळी वादळवार्याने नागरिकांची तारांबळ....तातडीच्या मदतीची मागणी

 परळी वैजनाथ तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; दुसऱ्या घटनेत बैल दगावला  





परळी वैजनाथ : प्रतिनिधी... काल सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या अनुषंगाने परळी वैजनाथ तालुक्यातील सबदराबाद येथे एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर कौडगाव हुडा  येथे वीज कोसळून एका बैलाचाही मृत्यू झाला आहे

        मिळालेल्या माहितीनुसार, सबदराबाद (ता. परळी वैजनाथ) येथील शेतकरी बालाजी बाबुराव चव्हाण (वय ३७) हे शेतात काम करत असताना पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबले होते. याचवेळी अचानक वीज कोसळल्याने त्यांच्या अंगावर आघात झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. मृत चव्हाण यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी सबदराबाद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

         दरम्यान, कौडगाव हुडा येथील धनराज आश्रोबा फपाळ यांचा एक बैलही वीज पडून दगावल्याची घटना घडली आहे. अवकाळी पावसासह अचानक कोसळलेल्या विजेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या दुर्दैवी घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पंचनामा करून बाधित शेतकरी कुटुंबांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. याबाबत परळीचे प्रभारी तहसीलदार विनोद रणवारे यांनी सांगितले की, या दुर्घटनेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आली असून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या