इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी बाबा शेख यांची निवड परळी वैजनाथ | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देत पक्षाने बाबा शेख यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बीडचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा शिंदे आणि शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केज येथील पवनसुत निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन बाबा शेख यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी पक्षकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शहर व तालुक्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचा विस्तार सुरू असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष अधिक जोमाने जनसंपर्क वाढविणार आहे. नियुक्तीनंतर बाबा शेख यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटना बळकट करण्...

मोबाईल तसेच सोशल मिडियाच्या दुष्परिणामामुळे मुलांमध्ये विकृती वाढत असल्याचे चित्र

आठ दिवसात अंबाजोगाई परिसरातील दुसरी घटना: पुन्हा १३ वर्षीय मुलाकडून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- मराठवाड्याचे पुणे म्हणून नावाजलेले अंबाजोगाई शहर आज किशोरवयीन मुलांच्या मोबाईल तथा सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे काहीसे शहराला गालबोट लागत असल्याचे दिसून येऊ पहात आहे. एकाच आठवड्यात अंबाजोगाई तालुक्यातील दोन गावात अडीच तीन वर्षांच्या चिमुकल्या जीवांवर तेरा चौदा वर्षाच्या मुलांकडून अत्याचार घडल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. तालुक्यातील जवळगाव येथे एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मंगळवार, ३१ मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली असून, याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी एका १३ वर्षीय शाळकरी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या आठवड्याभरापूर्वीच डोंगर पिंपळा येथे एका १५ वर्षीय मुलाने आपल्याच नात्यातील चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच, ही दुसरी घटना घडल्याने अंबाजोगाई तालुक्यासह संपूर्ण जिल्हा पिळवटून निघाला आहे.

            मंगळवार ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पीडित चिमुरडी आपल्या घरामागील मोकळ्या मैदानात शौचास गेली होती. यावेळी गावातीलच एका अल्पवयीन मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत चिमुरडीला गंभीर दुखापत झाली आहे. चिमुकलीस होत असलेल्या त्रासामुळे तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी घडलेला हा किळसवाणा प्रकार सांगितल्याने पीडितेच्या आईने बुधवारी १ एप्रिल रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर 

बर्दापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६५(२) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांकडून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. चिंतेची बाब म्हणजे, मागील आठवड्यातच डोंगर पिंपळा येथे एका १५ वर्षीय मुलाने अश्लील चित्रफित पाहून आपल्याच नात्यातील अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले होते. त्या घटनेचा तपास सुरू असतानाच जवळगावमध्ये ही दुसरी घटना घडल्याने पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत कमी वयातील मुले अशा प्रकारच्या गंभीर गुन्हेगारीकडे आणि विकृत मानसिकतेकडे का वळत आहेत, हा प्रश्न आता निर्माण होत आहे. या घटनांमुळे मुलांच्या संगोपनावर आणि मोबाईलमुळे त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारांबद्दल सामाजिक स्तरावर मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. यावरून पाल्य व पालक यांच्यातील वाढत असलेला दुरावा किंवा पालकांचे आपल्या पाल्यांप्रति होत असलेले दुर्लक्ष हे तर कारणीभूत ठरत नाही ना असा यक्षप्रश्न देखील समाजमनात निर्माण होत आहे. अंबाजोगाई शहर व परिसराची असलेली प्राचीन सांस्कृतिक ओळख कायम पुढे अशीच ठेवायची असेल तर पालकांनी आपला पाल्य काय करतो आहे याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे किंवा त्यांना समुपदेशन केले पाहिजे एवढे मात्र नक्की.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या