जीवाची लाही लाही....

इमेज
  परळी शहरात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सियसवर उन्हाच्या तडाख्याने दुपारी रस्ते सामसूम; परळी शहरात सुर्य ओकत आहे आग !! परळी/संतोष जुजगर परळी वैजनाथ तालुक्यात सध्या लग्नसराई चालू आहे.लग्नसराईच्या दिवसांमध्ये उन्हाची तिव्रता अधिक वाढू लागली आहे.लग्न कार्यानिमित्ताने खरेदी साठी बाजारपेठेकडे ग्रामीण भागातील नागरिक धाव घेतांना दिसत आहे. लग्नाचे कपडे, किराणा, दाग-दागिने खरेदीवर विशेष जोर देतं आहे.त्यातच नागरिकांच्या जिवाची उन्हामुळे लाही-लाही होतं आहे.यामुळे उन्हापासुन घामाघूम झालेले नागरीक, महिला, वयोवृद्ध, व बच्चे कंपनी थोडासा उन्हापासुन दिलासा मिळावा यासाठी शहरातील शितपेय व ऊसाच्या रसावर ताव मारत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पारा प्रथमच 39 अंश सेल्सियसवर पोहोचला. उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारनंतर परळी शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.  लग्नसराई असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरात विविध लग्नसामग्री खरेदी साठी येतं आहे.लग्नसराई महिना असल्याने नागरिक लग्नसामग्रीसह उन्हापासुन बचावासाठी टोप्या, रुमाल आदी खरेदी करतं आहे.उन्हाची तिव्रता असल्यामुळे शहरातील विविध दुकानंदार उन्हाच्या ...

परळीत पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार

प्रथमेश आणि प्रांजली भावंडांचे यश! 



परळीत पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार  

परळी/ प्रतिनिधी 

परळी येथील फुले आंबेडकरी अभ्यासक इंजि. भगवान साकसमुद्रे यांचे पुतणे तथा बालासाहेब साकसमुद्रे यांची मुले प्रथमेश आणि प्रांजली यांनी एसएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. प्रांजली हिला 94.80 तर प्रथमेश याला 94.20 गूण मिळाले आहेत. या त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याचाच भाग म्हणून आज परळी पत्रकार बांधवांच्या वतीने साकसमुद्रे भावंडांचा सत्कार पुण्यनगरी कार्यालय परळी येथे करण्यात आला यावेळी दैनिक पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी तथा अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे धनंजय अरबुने, दैनिक अतुल्य महाराष्ट्रचे संपादक नितीन ढाकणे, लक्ष्मण वैराळ सर, माहिती अधिकार कार्यकर्ते सम्राट गित्ते, आम्रपाली साकसमुद्रे,साक्षी साकसमुद्रे दिसत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....