जीवाची लाही लाही....

 परळी शहरात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सियसवर



उन्हाच्या तडाख्याने दुपारी रस्ते सामसूम; परळी शहरात सुर्य ओकत आहे आग !!

परळी/संतोष जुजगर

परळी वैजनाथ तालुक्यात सध्या लग्नसराई चालू आहे.लग्नसराईच्या दिवसांमध्ये उन्हाची तिव्रता अधिक वाढू लागली आहे.लग्न कार्यानिमित्ताने खरेदी साठी बाजारपेठेकडे ग्रामीण भागातील नागरिक धाव घेतांना दिसत आहे. लग्नाचे कपडे, किराणा, दाग-दागिने खरेदीवर विशेष जोर देतं आहे.त्यातच नागरिकांच्या जिवाची उन्हामुळे लाही-लाही होतं आहे.यामुळे उन्हापासुन घामाघूम झालेले नागरीक, महिला, वयोवृद्ध, व बच्चे कंपनी थोडासा उन्हापासुन दिलासा मिळावा यासाठी शहरातील शितपेय व ऊसाच्या रसावर ताव मारत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पारा प्रथमच 39 अंश सेल्सियसवर पोहोचला. उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारनंतर परळी शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. 

लग्नसराई असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरात विविध लग्नसामग्री खरेदी साठी येतं आहे.लग्नसराई महिना असल्याने नागरिक लग्नसामग्रीसह उन्हापासुन बचावासाठी टोप्या, रुमाल आदी खरेदी करतं आहे.उन्हाची तिव्रता असल्यामुळे शहरातील विविध दुकानंदार उन्हाच्या झळापासुन वाचण्यासाठी कुलरचा वापर करतं असल्यामुळे बाजारात कुलरची मागणी वाढली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीच्या आठवड्यात सुर्य प्रचंड आग ओकत असून अजून तापमान किती राहिल हे सांगता येणे कठीण आहे. प्रचंड तापमानामुळे नागरिकांसह बच्चे कंपनीच्या अंगाची लाहीलाही होतं आहे.उन्हाचे चटके बसत असल्याने दुपारी शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे.वाढत्या उन्हापासुन बचावासाठी बाजारात लिंबू शरबत, ऊसाचा रस, लस्सी, ज्यूस यासह थंड शितपेयाची बाजारात विक्री होताना दिसत आहे.  शुद्ध व थंड पाणी विकत घेण्याचे ही प्रमाण वाढले आहे.त्यामुळे पाणी विकणाराचा धंदा तेजीत आला आहे.एकंदरीत एन लग्नसराई सूर्य देव आग ओकत असल्यामुळे नागरिकांची उन्हामुळे लाही-लाही होतं आहे.म्हणुन उन्हाचा पारा चढला जीवाची होते लाही लाही असे म्हण्याचीच वेळ आलेली आहे.

आरोग्याची काळजी घ्या-डॉ.विवेक दंडे

परळी शहर व तालुक्यातील उष्णतेचा कहर कमी होण्याची सध्यातरी कोणतीही चिन्हे दिसत नसून, वाढत्या तापमानामुळे परळीकर नागरीक हैराण झाले आहेत. वाढती उष्णता लक्षात घेता नागरीकांनी विशेषत: लहान मुले व वृध्दांनी काळजी घेण्याची गरज असून, वाढत्या उन्हात काम नसल्यास बाहेर जाणे टाळावे. वाढते तापमान टाळून आपले आरोग्य जपण्यासाठी अंगमेहनतीचे काम करणार्‍यांन दुपारच्या टप्यात विशेषत: 1 ते 4 या वेळेत काम बंद ठेवणे गरजेचे आहे. उन्हाचा कडाका वाढणार असल्याने नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे. प्रवास अथवा काही कामानिमित्त बाहेर निघाल्यास पाण्याची बाटली सोबत ठेवावी. डोक्यावर पांढरी टोपी, रुमाल बांधावा. वेळोवेळी पाणी प्यावे. झळ लागल्यास थंड पाण्याने अंघोळ करावी असे डॉ.विवेक दंडे, पारिजात क्लिनीक, नेहरू चौक (तळ) परळी वै. यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार