प.पु. अमृताश्रम स्वामी यांची सदिच्छा भेट: जोशी परिवाराने घेतले आशिर्वाद 




<amp-auto-ads type="adsense" data-ad-client="ca-pub-9098747875103891">

पाटोदा, प्रतिनिधी — ह.भ.प. आचार्य डॉ. अमृताश्रम स्वामी महाराज नवगण राजुरीकर यांनी बुधवार, १३ मे रोजी पत्रकार विजय जोशी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी जोशी परिवाराच्या वतीने महाराजांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी वातावरण भक्तिमय झाले होते. उपस्थितांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले. समाजप्रबोधन, अध्यात्म आणि संस्कार यांवर महाराजांनी मार्गदर्शन करत उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार छगन मुळे, नगरसेवक रामेश्वर गोरे, पत्रकार अमोल जोशी, हरिभाऊ राऊत, सतीश जाधव सर, योगेश पंडित, गणेश खंडागळे, सुरवसे महाराज, शेषराव नाईकणवरे, अमर बनकर यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार