संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

या निर्णयाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

 नीट २०२६ परीक्षा रद्द! पेपरफुटीच्या आरोपानंतर सीबीआय चौकशीचे आदेश आणि फेरपरीक्षेचा निर्णय

       परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

        राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) १० मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकाचा संदर्भ देत, NEET (UG) २०२६ परीक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

परीक्षा रद्द का झाली?

देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा दिली होती, महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे आवश्यक असल्याचे ‘एनटीए’ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

पुढे काय?

सीबीआय आता या पेपरफुटीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तपास करणार आहे. दुसरीकडे, ‘एनटीए’ लवकरच परीक्षेची नवीन तारीख जाहीर करेल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता, केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आपल्या अभ्यासाचे नियोजन पुन्हा एकदा नीट करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या निर्णयाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

१. परीक्षा रद्द आणि फेरपरीक्षा

विविध तपास यंत्रणांकडून प्राप्त झालेले अहवाल आणि पुराव्यांच्या आधारे, एनजीएने (NTA) केंद्र सरकारच्या मान्यतेने ३ मे २०२६ रोजी झालेली ‘नीट’ (NEET-UG) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची प्रक्रिया आता ग्राह्य धरली जाणार नाही. फेरपरीक्षेच्या तारखा लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.

२. सीबीआय (CBI) चौकशीचे आदेश

या प्रकरणातील कथित अनियमिततेची आणि आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी भारत सरकारने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. NTA या चौकशीत पूर्ण सहकार्य करेल आणि सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे उपलब्ध करून देईल.

३. विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च

हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी घेण्यात आला आहे. फेरपरीक्षेमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना होणाऱ्या त्रासाची संस्थेला जाणीव आहे. मात्र, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींकडे दुर्लक्ष करणे हे शैक्षणिक व्यवस्थेसाठी अधिक घातक ठरले असते, असे NTA ने स्पष्ट केले आहे.

४. फी आणि नोंदणीबाबत स्पष्टीकरण

नोंदणी: मे २०२६ च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी केलेली नोंदणी आणि निवडलेली परीक्षा केंद्रे फेरपरीक्षेसाठी कायम राहतील.

फी: विद्यार्थ्यांना कोणतीही नवीन नोंदणी करण्याची किंवा अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज नाही. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेली फी परत (Refund) केली जाईल आणि फेरपरीक्षेचा खर्च NTA स्वतःच्या अंतर्गत निधीतून करेल.

. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा

परीक्षेच्या नवीन तारखा आणि प्रवेशपत्राचे (Admit Card) वेळापत्रक केवळ NTA च्या अधिकृत चॅनेलवरूनच प्रसिद्ध केले जाईल. सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विद्यार्थी आणि पालकांना करण्यात आले आहे.

राजस्थानमधील पेपरफुटीचं प्रकरण नेमकं काय होत?

राजस्थानमध्ये एका हस्तलिखित ‘गेस पेपर’मुळे वाद निर्माण झाला होता. ४१० प्रश्नांचा एक ‘गेस पेपर’ परीक्षेच्या महिनाभर आधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता, ज्यातील सुमारे १२० प्रश्न मुख्य परीक्षेत आल्याचा दावा केला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....