परळीत १३ मे रोजी भव्य 'सामूहिक सुदर्शन होम' आणि सत्संगाचे आयोजन




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आणि पूज्य श्री श्री रविशंकर जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार, दिनांक १३ मे २०२६ रोजी परळीत भव्य 'सामूहिक सुदर्शन होम'चे आयोजन करण्यात आले आहे. वैदिक धर्म संस्थानतर्फे देशभरात आयोजित केल्या जाणाऱ्या ७० सुदर्शन होमांचाच हा एक भाग आहे.

सामूहिक सुदर्शन होम विधी बुधवार, दिनांक १३ मे २०२६ रोजी परळी वैजनाथ येथील 'श्री श्री ज्ञान मंदिर' (वैद्यनाथ मंदिर पूर्व दिशा, पार्किंग लॉटच्या मागे) येथे दुपारी ४:३० ते सायंकाळी ६:०० या वेळेत संपन्न होईल.  सुदर्शन होम हा नकारात्मक ऊर्जा आणि जीवनातील अडथळे दूर करणारा अत्यंत प्रभावी वैदिक विधी मानला जातो. या मुख्य विधीनंतर जाहीर सत्संग आणि महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहून भाविकांना संकल्प सोडता येणार आहे.कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी किंवा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविक https://Vdst.in/e/77115 या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.  ९८६०४७४८२१  ९८८१२७०२२१, ९९२३२८७७७७ या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार