शिक्षण क्षेत्रातील नवनवीन बदल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा उद्देश

 नवीन पुस्तक अभ्यासक्रम प्रशिक्षणाचा शुभारंभ

परळी / प्रतिनिधी

     शिक्षण क्षेत्रातील नवनवीन बदल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने माउंट लिटेरा झी स्कूल परळी वैजनाथ येथे इयत्ता सहावीच्या नवीन पुस्तक अभ्यासक्रम प्रशिक्षणाचा शुभारंभ आज दि ११ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. श्रीमती फुंदे एस. एन. व श्रीमती देशपांडे एम. जी. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला.उद्घाटन प्रशिक्षण प्रमुख  दहिफळे बी. व्ही. यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व प्रार्थना श्री राजकुमार ठोके सरांनी आपल्या सुरेल आवाजात सादर करून वातावरण भारावून टाकले.सुलभकांचा सन्मानप्रशिक्षणासाठी निवडलेल्या सुलभकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये  लोंढे एम. एन. सर,अमोल कांबळे सर, राजकुमार ठोके सर, अनुपकुमार कुसुमकर सर, गजानन जोशी सर, गोचडे एफ. जी. सर व सोळंके व्ही. पी. सर यांचा समावेश होता.

    प्रशिक्षणाची सुरुवात ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षणपूर्व चाचणी घेऊन करण्यात आली. याचे संचलन तंत्रस्नेही शिक्षक कुसुमकर सर यांनी केले. या प्रशिक्षणात परळी तालुक्यातील विविध शाळांमधील सहावी इयत्तेला शिकवणाऱ्या शिक्षकांचा सहभाग होता. पुढील चार दिवस हे प्रशिक्षण नियोजनानुसार पार पडणार असून शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.शैक्षणिक महत्त्वया प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची सखोल माहिती मिळणार असून विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी पद्धतीने शिकवता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशिक्षण दिले जात असल्याने शिक्षकांना डिजिटल शिक्षण पद्धतीचीही ओळख होणार आहे.माउंट लिटेरा झी स्कूल परळी वैजनाथ येथे झालेल्या या कार्यक्रमाने शिक्षण क्षेत्रात नवा उत्साह निर्माण केला आहे. शिक्षकांचा सहभाग, सुलभकांचा सन्मान आणि आधुनिक पद्धतीने दिले जाणारे प्रशिक्षण यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच गती मिळणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार