मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन......

 उद्या परळीत तिरंगा रॅली ; सहभागी होण्याचे भाजपचे आवाहन



परळी वैजनाथ, दि. १२ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने परळी शहरात उद्या गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या सूचनेनुसार ही रॅली काढण्यात येणार असून, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात होणार असून बस स्टँड रोड, एक मिनार चौक, स्टेशन रोड मार्गे मार्केट कमिटी येथे रॅलीचा समारोप होणार आहे. या तिरंगा रॅलीमध्ये शहरातील ज्येष्ठ मंडळी, प्रमुख पदाधिकारी, विविध संस्थांचे संचालक, नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या या रॅलीत नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष राजेश गित्ते, वसंत निर्मळ, शहराध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार