व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध- सुरेंद्र रेदासणी

मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे नुतन अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, महासचिव संदीप लाहोटी यांचा सत्कार उत्साहात

व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध- सुरेंद्र रेदासणी

व्यापाऱ्यांची एकता हीच आपली शक्ती- संदीप लाहोटी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) व्यापारी वर्गाची अतिशय महत्वाची संघटना अशी ओळख असलेल्या मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी सुरेंद्र रेदासणी, महासचिवपदी संदीप लाहोटी यांची निवड झाल्याबद्दल परळी वैजनाथ विविध व्यापारी महासंघाच्यावतीने भव्य सत्कार उत्साहात संपन्न झाला. व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही नुतन अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी यांनी दिली तर व्यापाऱ्यांची एकता हीच आपली शक्ती असल्याचे प्रतिपादन नुतन महासचिव संदीप लाहोटी यांनी केले. यावेळी शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       श्रद्धा मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या  सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांनी भूषविले. यावेळी व्यासपीठावर वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन विनोद सामत, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे, माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रतन कोठारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयपाल लाहोटी व सुरेश मुंडे, न. प. बांधकाम सभापती प्रा. पवन मुंडे, न. प. सभापती सौ. अंजली लोखंडे, वैद्यनाथ बँकेचे माजी चेअरमन अशोक जैन, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे नुतन सचिव जाफर मिर्झा, सहसचिव धनंजय जेवरीकर, परळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड आदींची उपस्थिती होती.

      प्रारंभी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कु. प्रतिक्षा कस्तुरे हिने स्वागत गीत सादर केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी व महासचिव संदीप लाहोटी  यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सुरेंद्र रेदासणी म्हणाले की, मराठवाडा जशी संताची भूमी आहे तसा विविध उद्योगाची जननी आहे. अनेक उद्योग आहेत. त्यामुळे व्यापाराचे मोठे जाळे आहे. व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही संघटनात्मक प्रयत्न करणार आहोत. मी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करणारा आहे. चांगले काम करून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणा असल्याचे सांगून निवडीनंतर पहिला सत्कार येथे होत असुन मी भारावून गेलो आहे. यावेळी संदीप लाहोटी म्हणाले की, मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्स ही व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे संघटन आहे. आपली एकी हीच आपली ताकद आहे त्यामुळे आपण आपले ऐक्य महत्त्वाचे आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगून आपल्या प्रेमाचा कायम ऋणी राहणार असल्याचे सांगितले. 

     नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी म्हणाल्या की, व्यापारी हे केवळ व्यावसायिक नसून आर्थिक कणा आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवून व्यवसाय वाढवण्यासाठी नगर परिषद कायम सोबत राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जुगलकिशोर लोहिया, माऊली फड, प्रा. पवन मुंडे, बंडू गरुड आदींची भाषणे झाली. यावेळी परळीकरांच्या वतीने नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी व बाजीराव धर्माधिकारी यांनी सुरेंद्र रेदासणी आणि संदीप लाहोटी यांचा सत्कार केला. पुरस्कार मिळाल्याबद्दल वैजनाथ कोल्हे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ कंकाळ यांनी केले. संचलन महेश मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन नंदलाल बियाणी यांनी केले. 

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी व्यापारी महासंघाचे सर्वश्री माऊली दादा फड, बंडू सेठ गरुड,  विष्णू देवशेठवार, नंदू शेठ बियाणी, विष्णु देवशेठवार, जगदीश लड्डा, जयप्रकाश लड्डा, नितीन अग्रवाल, सुरेश आण्णा टाक, शंकर आडेपवार, उद्धव फड,  गोपाळ कंकाळ आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार