आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक

 जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी; श्रावणापूर्वी स्वच्छतागृहे खुली करण्याची मागणी

परळी/प्रतिनिधी : बीड जिल्ह्यात सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था व्हावी यासाठी समाजवादी पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सालेहा शेख जिलानी यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून श्रावणापूर्वी परळीतील नव्याने बांधलेली सुलभ शौचालये तातडीने खुली करण्याची मागणी करण्यात आली आहे.

      जिल्हाधिकारी, बीड यांनी १२ जून २०२५ रोजी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालये उभारण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिलानी यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. अनेक ठिकाणी अपेक्षित कार्यवाही झालेली नसली तरी परळी नगर परिषदेने शहरात ३ ठिकाणी ठिकाणी महिला आणि पुरुष सुलभ शौचालये बांधली आहेत. ती तातडीने नागरिकांसाठी खुली करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

श्रावणात भाविकांची मोठी गर्दी

परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग असल्याने श्रावणात देशभरातून लाखो भाविक येतात. त्यामुळे सार्वजनिक सुविधांवर ताण येतो. त्या ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहे उभी करावीत या

मागणी सह भाविक व नागरिकांना स्वच्छतागृहांची ठिकाणे सहज समजावीत यासाठी ठळक दिशादर्शक फलक लावावेत. श्रावणापूर्वी सर्व स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छता करून ती खुली करावीत. जिथे सुविधा अपुरी आहे तिथे मोबाईल स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची केवळ नोंद न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी होत आहे. श्रावणात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार