बेलवाडी मठात महिनाभर मौन तपोअनुष्ठान: नीलकंठ शिवाचार्य महाराजांनी घेतले वैद्यनाथांचे दर्शन

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

     श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी पहाटे गदगेश्वर हिरेमठ, तालुका आळंद, जिल्हा गुलबर्गा (कर्नाटक) येथील श्री ष. ब्र. १०८ नीलकंठ शिवाचार्य महाराज यांनी प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी मठपती दयानंद स्वामी, अनिरुद्ध स्वामी यांची उपस्थिती होती. श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी नीलकंठ शिवाचार्य महाराजांचे स्वागत करून सत्कार केला. याप्रसंगी विकास हालगे, गिरीश संकाये, संजय खाकरे, सोमनाथ गोपनपाळे, नंदीकोल्हे आप्पा आदी उपस्थित होते.

बेलवाडी मठात महिनाभर मौन तपोअनुष्ठान

श्रावणमासनिमित्त नीलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या श्री संत गुरुलिंग स्वामी मठ, बेलवाडी येथे महिनाभराच्या मौन तपोअनुष्ठानास प्रारंभ झाला आहे. श्रावण महिन्यातील आध्यात्मिक साधनेचा एक भाग म्हणून हे तपोअनुष्ठान करण्यात येत आहे.

या तपोअनुष्ठानाच्या निमित्ताने बेलवाडी मठ परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण महिनाभर मठ परिसरात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण राहणार आहे. श्रावणातील या विशेष साधना आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार