तारखेत बदल.....

परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमीपूजन तारखेत बदल ; भूमीपूजन आता १४ ऐवजी १५ ऑगस्टला

मुंबई दि. १० --

 ५६५ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्या तारखेत बदल झाला असून आता हे भूमीपूजन १४ ऐवजी १५ ऑगस्ट रोजी होणार आहे अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

  १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वा. उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आणि पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली  ग्रामीण पोलीस ठाण्याजवळ असलेल्या टेकडीवरील मैदानात हा भूमीपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून सध्या तयारी सुरू झाली आहे.

     बीड येथे शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि जालना येथील ध्वजारोहण आटोपून ना. पंकजाताई मुंडे परळीत येणार आहेत. प्रशासनाने तारखेतील बदलाची नोंद घेत कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार