अंबरनाथमधील 'त्या' घटनेची ना.पंकजा मुंडेंनी घेतली दखल..

मानवाप्रमाणेच प्राण्यांच्या जीवाचंही तेच मोल, अशी क्रूरता अक्षम्य आहे ; आरोपीवर तातडीने कारवाई करा



अंबरनाथमधील 'त्या' घटनेची ना.पंकजा मुंडेंनी घेतली दखल ;  ठाण्याच्या एसपींना केली सूचना

मुंबई दि. ११ ---

अंबरनाथच्या रॉयल फ्लोरा फेज-2 मध्ये २६ जुलैला बाराव्या मजल्यावरून मांजरीला खाली ढकलून ठार केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेवर  राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी ठाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाईसाठी पत्र पाठवले आहे.

'प्राण्यांच्या जीवाचे मोल जपणे हे आपले कर्तव्यच आहे, मी स्वतः यात लक्ष घातले आहे, अशी क्रूरता अक्ष्यम आहे' अशा शब्दांत त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात पंकजाताई मुंडे यांनी त्या घटनेचा उल्लेख करत नमूद केले आहे, की मांजराच्या लहान पिल्लाला इमारतीवरून एका व्यक्तीने खाली फेकल्यामुळे मृत्यू झाल्याची बदलापूर येथील घटना निदर्शनास आली आहे.

या विरोधात स्थानिक प्राणिमित्र संघटनांनी कारवाई होत नसल्याने रोष व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात पसरला आहे. यातील आरोपी व्यक्तीची कृती प्राण्यांविरुद्ध क्रूरता करणारी असल्याने प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. अशा व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023, कलम 325 नुसार कोणत्याही प्राण्याला मग तो पाळीव असो भटका असो किंवा जंगली असो, ठार मारणे, विष देणे, त्याच्या शरीराचा अवयव तोडून त्याला अपंग करणे किंवा त्याला कायमचे निरुपयोगी करणे प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 पीसीए अॅक्ट 1960च्या कलम 11 (1) अ नुसार प्राण्यांना शारीरिक इजा पोहोचेल अशाप्रकारे मारहाण करणे गुन्हा आहे.तसेच त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेणे किंवा त्यांना विनाकारण वेदना देणे प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 पीसीए ऍक्ट 1960 च्या कलम 11 (1) ल नुसार कोणत्याही प्राण्याला अमानुषपणे अपंग करणे किंवा स्ट्राइकनाईन सारख्या विषारी रसायनांचा वापर करून अथवा विनाकारण क्रूरपणे मारणे या विषयात मी स्वतः लक्ष घालत आहे. मानवाप्रमाणेच प्राण्यांच्या जीवाचं ही तेच मोल आहे, अशी क्रूरता अक्षम्य आहे त्याबाबत त्वरित कार्यवाही करून मला अवगत करावे, असे पंकजाताई मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती ठाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा सदस्य सचिव जिल्हा आणि प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती जिल्हा ठाणे यांनाही पाठवण्यात आली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार