परळीच्या अक्षय क्षिरसागरची पुणे मेट्रोमध्ये पायलट म्हणून निवड



अभियांत्रिकी शिक्षणानंतर मिळविले उल्लेखनीय यश; क्षिरसागर कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी वैजनाथ येथील दैनिक मराठवाडा साथीचे विशेष प्रतिनिधी तथा किसान ट्रॅक्टर्सचे संचालक श्री. संजय देविदासराव क्षिरसागर यांचे सुपुत्र चि. अक्षय संजय क्षिरसागर याची पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पात मेट्रो पायलट म्हणून निवड झाली आहे. आवश्यक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर अक्षयने मेट्रो पायलट म्हणून आपली सेवा सुरू केली असून, त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे परळीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अक्षयचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण हैदराबाद येथे इंग्रजी माध्यमातून झाले. त्यानंतर बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कमल नयन बजाज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये त्याने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. अभियांत्रिकी शिक्षणानंतर पुणे मेट्रोच्या पायलट पदासाठी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करून त्याने ही जबाबदारी स्वीकारली.

तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळवत अक्षयने आपल्या गुणवत्तेची आणि मेहनतीची चुणूक दाखवून दिली आहे. पुणे मेट्रोसारख्या महत्त्वपूर्ण सार्वजनिक वाहतूक प्रकल्पात पायलट म्हणून जबाबदारी स्वीकारणाऱ्या परळीच्या या तरुणाचे यश निश्चितच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद मानले जात आहे.

अक्षय क्षिरसागरच्या या यशाबद्दल क्षिरसागर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक तसेच परळी शहरातील विविध स्तरांतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या पुढील उज्ज्वल आणि यशस्वी वाटचालीसाठी सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार