महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा
परळी वैजनाथ , प्रतिनिधी ....
कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय ग्रामीण रुग्णालय परळी वै. येथील समुपदेशक शरद चव्हाण हे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या र्डॉ.विद्याताई देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले.त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी विवेकानंद कवडे यांनी प्रास्ताविकात प्रस्तुत कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली.प्रमुख पाहुणे समुपदेशक शरद चव्हण यांनी त्यांच्या वक्तव्यातून विद्यार्थिनींना आरोग्य विषयक माहिती दिली व एड्स विषयीचे सविस्तर मार्गदर्शन केले व क्युआर कोड बद्दल माहिती दिली. विद्यार्थीनींनी आपल्या दररोजच्या आहारात कोणत्या गोष्टी चा समावेश करावा व कोणते पदार्थ व पेय घेणे अपायकारक आहे या वरही सविस्तर मार्गदर्शन केले. योग्य आहार व योग्य व्यायाम या गोष्टी युवकांना सदृढ बनवतात असे ते म्हणाले. त्यानंतरच्या अध्यक्षीय समारोपात प्रा. प्रसाद देशमुख यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना म्हटले की युवक म्हणजे ऊर्जा ,जिद्द व परिवर्तनाची धमक असलेला समर्थ व्यक्ती असतो .याशिवाय त्यांनी युवकांची बेरोजगारी हा चिंतेचा विषय असल्याचेही प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरुण चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. व्ही.डी गुळभिले यांनी मानले.या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा