रोटरी क्लब अंबाजोगाई सिटीला प्रांतातील सर्वोत्तम क्लबचा बहुमान

वर्षभरात ५० हून अधिक पुरस्कार; एनआयसीयू ची उभारणी ते वृक्षारोपणापर्यंत उल्लेखनीय कार्य

अंबाजोगाई-:  सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावातून रोटरी क्लब अंबाजोगाई सिटीने रोटरी वर्ष २०२५-२६ मध्ये संपूर्ण रोटरी प्रांत ३१३२ मध्ये आपला ठसा उमटवला आहे. वर्षभरातील विविध उपक्रमांची  दखल घेत क्लबला ५० हून अधिक पुरस्कार व सन्मानप्राप्त झाले आहेत. त्यापैकी २५ प्रमुख पुरस्कारांचा गौरव ९ ऑगस्टरोजी लातूर येथील गौरव पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला.या सोहळ्यास प्रांतपाल  जयेश पटेल, माजी प्रांतपाल  सुधीर लातूरे, उपप्रांतपाल  प्रवीण देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

    या सोहळ्यात क्लबला मिळालेला सर्वात मोठा बहुमान म्हणजे  सर्वंकष  सर्वोत्तम रोटरी क्लब पुरस्कार – प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कारप्रा .रोहिणी पाठक, तसेच सर्वोत्तम साक्षरता प्रकल्प – प्रथम क्रमांक, सर्वोत्तम महिला सक्षमीकरण प्रकल्प – प्रथम क्रमांक, याशिवाय मुलगी वाचवा, व्यावसायिक सेवा, जनसंपर्क, पर्यावरण, आरवायएलए, बाल आरोग्य सेवा या क्षेत्रांत द्वितीय तर बुलेटिन, स्नेहमेळावा, नेत्रसेवा मध्ये तृतीय क्रमांक मिळाला. संतुलित कार्यक्रम चषक, वक्तृत्व स्पर्धा प्रकल्प चषक, सर्वोत्तम यूट्यूब वाहिनी  रुपेश रामावत यांनी हे विशेष पुरस्कारही पटकावले.या पुरस्कारांमागे प्रभावी सामाजिक प्रकल्प आहेत. जागतिक अनुदानांतर्गत लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालयात एनआयसीयू ची उभारणी करण्यात आली. ४४बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया,४०० हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी सहकार्य, कर्करोग व मधुमेह तपासणी शिबिरे, आनंदी शाळा,  ग्रंथप्रसादालय, महिला उद्योजक मेळावे व प्रशिक्षण,१५०० हून अधिक वृक्षारोपण, स्मशानभूमी सुशोभीकरण, वैकुंठ मार्गाचे हरितीकरण.  ४०० हून अधिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती प्रशिक्षण.मुलगी वाचवा अभियान, पूरग्रस्तांसाठी निधी संकलन, जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट बोर्ड, सीसीटीव्ही, हॅण्ड वॉश स्टेशन, सॅनिटरी नॅपकिन मशीन चे वाटप असे विविध महत्वपूर्ण उपक्रम वर्षभर राबविण्यात आले.तसेच क्लबच्या सर्व सदस्यांना पॉल हॅरिस फेलो, ईआरईवाय व प्लॅटिनियम क्लब पुरस्कार. अंदाजे २२ हजार डॉलर इतके योगदान. टीआरएफ संचालक डॉ. नवनाथ घुगे यांना मेजर डोनर हा सन्मान  प्राप्त झाला.

"हा पुरस्कार प्रत्येक रोटेरियनचा आहे. एकजूट आणि सेवाभावामुळेच एकत्रितपणे चांगल्या कामांसाठी ही भावना कृतीत उतरवता आली" वर्षभरात १५५ विविध प्रकल्प राबवून  ६५ हजार लोकांपर्यंत विविध सेवा देता आल्या. 

- प्रा.रोहिणी पाठक, माजी अध्यक्षा,रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार