पोस्ट्स

इमेज
  संघर्षातून यशाकडे: भांडी-धुणी करणाऱ्या माऊलीच्या लेकीची १२ वीच्या परीक्षेत मोठी झेप! परळी वैजनाथ,प्रतिनिधी... आईने दुसऱ्यांच्या घरी भांडी-धुणी करून काबाडकष्ट केले आणि मुलीनेही त्या कष्टाचे चीज करत १२ वीच्या परीक्षेत तब्बल ७८% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. परिस्थिती बेताची असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या तनुजा रणदिवे या मुलीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तनुजा ची आई पद्मिन तानाजी रणदिवे  गेल्या अनेक वर्षांपासून गणेशपार भागात धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पतीच्या निधनानंतर व आर्थिक स्थिती हलाखीची असताना घराची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर होती. "माझ्या वाट्याला आलेले कष्ट माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नयेत," याच एका ध्येयाने या माऊलीने दिवसरात्र काम केले. परळी येथे हनुमान नगर येथे किरायाच्या घरात राहणाऱ्या व घरात अभ्यासासाठी वेगळी खोली नाही की महागडे क्लास लावण्याची सोय नव्हती. आई कामावर गेल्यावर घरची कामे आटपून ही मुलगी अभ्यासाला बसायची. रात्री उशिरा पर्यंत तिने चिकाटीने अभ्यास केला. कष्टाचे मोल जाणणाऱ्या तनुजाने अभ्यासात कधीही ...

विज्ञान शाखेतून स्नेहल लक्ष्मण अनंतपुरे तर कला शाखेतून शेख मसिरा मोईझ प्रथम

इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम, विज्ञान शाखेचा १०० टक्के, तर कला शाखेचा ७६.८ टक्के  विज्ञान शाखेतून स्नेहल लक्ष्मण अनंतपुरे तर कला शाखेतून शेख मसिरा मोईझ प्रथम  परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)         लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाने १२ वी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून स्नेहल अनंतपुरे तर कला शाखेतून शेख मसिरा मोईझ प्रथम आली आहे. याबदल प्राचार्या व संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.              शहरातील लक्ष्मीबाई देशमुख कनिष्ठ महिला महाविद्यालयाने बारावी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून काँलेजचा निकाल ९२.८१ टक्के लागला आहे. महाविद्यालयातून विज्ञान शाखेची विद्यार्थिनी विज्ञान शाखेतून प्रथम स्नेहल लक्ष्मण अनंतपुरे (७९.६७), द्वितीय- शेख अनम सिराज (७४.५०), तृतीय- सय्यद झवेरिया अफसर (७३.८३) तर कला शाखेची विद्यार्थिनी शेख मसिरा मोईझ (७८.८३) प्रथम, द्वितीय शेख इशरत बेगम सलीम  (७२.५०), त...

परळी औष्णिक विद्युत केंद्रात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात...

इमेज
महाराष्ट्राच्या प्रगतीला महानिर्मितीची ऊर्जा : परळी केंद्रातील संच क्र. ६ चा ऐतिहासिक उच्चांक - मुख्य अभियंता सुनील इंगळे परळी औष्णिक विद्युत केंद्रात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात परळी | प्रतिनिधी “महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महानिर्मितीचा मोलाचा वाटा असून राज्याच्या औद्योगिक, कृषी आणि सामाजिक प्रगतीसाठी अखंडित वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. विशेष म्हणजे संच क्रमांक ६ ने सलग १४० दिवस पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करून ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला असून महाराष्ट्राच्या प्रगतीला महानिर्मितीची ऊर्जा प्रदान केली आहे,” असे प्रतिपादन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी केले.ते ६६ व्या महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. परळी औष्णिक विद्युत केंद्रात गुरुवार दि. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
इमेज
सार्वजनिक बांधकाम विभागातील भरती: खेळाडूंना 'मॅट'चा मोठा दिलासा, दोन महिन्यांत नियुक्ती देण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर: सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) 'स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक' (गट-क) पदाच्या भरती प्रक्रियेत ५ टक्के क्रीडा आरक्षणांतर्गत डावलण्यात आलेल्या दोन उमेदवारांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे या उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवता येणार नाही, असा निर्वाळा देत मॅटने या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर दोन महिन्यांच्या आत नियुक्ती देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. 'मॅट'चे उपाध्यक्ष न्यायमूर्ती व्ही. के. जाधव आणि सदस्य (प्रशासकीय) विनय कारगावकर यांनी हा निकाल दिला. नेमके प्रकरण काय? सार्वजनिक बांधकाम विभागाने १० ऑक्टोबर २०२३ रोजी २१०९ पदांसाठी भरतीची जाहिरात (क्र. ०१/२०२३) प्रसिद्ध केली होती. यामध्ये जळगाव येथील कल्पेश भगवान वंजारी याने 'भज-ड' (NT-D) क्रीडा प्रवर्गातून, तर छत्रपती संभाजीनगरच्या राधिका दिलीप पाटील हिने 'खुला' (Open) क्रीड...
इमेज
  जोयानबा मजाजोद्दीन इनामदार चे १२ वी परीक्षेत घवघवीत यश: महाविद्यालयातून तृतीय क्रमांक परळी वै. (प्रतिनिधी):      परळी वैजनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते मजाजोद्दीन इनामदार यांची सुकन्या जोयानबा हिने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तिने महाविद्यालयातील तृतीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.        इमदादूल उलूम उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शेख खाजा शेख महेताब व संस्थेचे सचिव सय्यद हनिफ सय्यद करिम व उपाध्यक्ष. शेख मुजफ्फर शेख महेबूब सह सचिव सय्यद इस्माईल सय्यद करीम, ताज खान अमीर खान, सय्यद हुसेन सय्यद करीम, सय्यद मुस्तफा सय्यद करीम ,अमजद अली जागीरदार , मुसा खान गुलाब खान, मोहम्मद रफीक मोहम्मद रज्जाक आदी उपस्थितीत होते. तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सय्यद वाजेद सय्यद कादर, प्रा. महेमूद सिद्दीकी, प्रा. सय्यद नईम, प्रा. सय्यद एकबाल इत्यादी उपस्थित होते. ङ्कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सय्यद ईकबाल यांनी क...

आरोपी पोलिसांच्या ताब्यात ....

इमेज
  केजमध्ये पुन्हा अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार ! शरीर संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ! केज :- केज तालुक्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचाराची घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला घरी बोलावून तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच आई, वडील भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. केज शहरातील एका भागात राहत असलेली शालेय शिक्षण घेत असलेली १५ वर्ष १० महिने वयाच्या मुलीचा पंधरा दिवसापूर्वी दि. १४ एप्रिल रोजी दुपारी १:०० ते ३:०० वा. च्या दरम्यान एका नराधमाने पाठलाग करून तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देवून तिला त्याच्या राहते घरी बोलावुन घेतले. त्या नंतर त्याने त्या अल्पवयीन मुली सोबत बळजबरीने आणि जबरदस्तीने शारीरिक लैंगिक संबंध प्रस्थापित केले. सदर घटने बाबत कोणाला काही सांगितल्यास मुलीच्या आई-वडील व भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुलीच्या मोबाईलवर आरोपीने व्हिडीओ कॉल करुन त्याचे मोबाईलची स्क्रीन शेअर केली आणि त्याच्याकडे असलेल्या पेनड्रा...
इमेज
‘… तोपर्यंत राजकारण्यांनो भेटायला येऊ नका’ नसरापूर मुलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया पुणे (Pune) जिल्हयातील भोर (Bhor) तालुक्यातील नसरापूर (Nasrapur) येथे घडलेल्या ४ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतानाच, पीडित मुलीच्या वडिलांनी एक व्हिडिओ प्रसारित करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राजकीय नेत्यांना एक कळकळीची विनंती केली आहे. पीडितेच्या वडिलांची व्हिडिओद्वारे विनंती पीडित मुलीचे वडील अस्थी विसर्जनासाठी देहू (Dehu) येथे गेले असताना त्यांनी हा व्हिडिओ संदेश जारी केला. त्यांनी म्हटले की, “जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत एकाही राजकीय नेत्याने सांत्वन करण्यासाठी माझ्या घरी येऊ नये. जेव्हा त्या गुन्हेगाराला फाशी होईल, तेव्हाच आम्ही राजकारण्यांना भेटू.” ही आपली आणि आपल्या कुटुंबाची नम्र इच्छा असल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर; परळी पॅटर्न तयार करणार- किरण गित्ते IAS

इमेज
 डी.डब्ल्यू.पी.एस. वंडरलँड शाळेचे शानदार उद्घाटन शिक्षणानेच समृद्धी व उन्नती; परळीतील या शैक्षणिक उपक्रमांसाठी सदैव पाठिशी - ना पंकजा मुंडे वंडरलँड मुळे परळीत अधुनिक शिक्षणाचे दालन खुले झाले - आ.धनंजय मुंडे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर; परळी पॅटर्न तयार करणार- किरण गित्ते IAS परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –        विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी संचलित दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल (डी.डब्ल्यू.पी.एस.) वंडरलँड शाळेचे उद्घाटन शनिवारी (दि. २ मे) सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजाताई मुंडे,माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास मा. श्री किरण गित्ते साहेब IAS ,माजी आमदार संजय दौंड,परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, सौ. उषाताई किरण गित्ते यांची उपस्थिती लाभली.           डी.डब्ल्यू.पी.एस. वंडरलँडनाथ रोड, परळी वैजनाथ येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी पंकजाताई मुंडे,आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्या...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....