सर्व स्तरांतून ओरड झाल्यानंतर प्रशासनाला आली जाग....
बीड जिल्ह्यातील शाळांची वेळ : शिक्षण विभागाने आधीच्या आदेशात केली सुधारणा परळी वैजनाथ | प्रतिनिधी अल निनोच्या प्रभावामुळे वाढलेले तापमान आणि उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद बीड यांनी सोमवार, दि. २३ जून २०२६ रोजी सुधारित आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उष्माघात, निर्जलीकरण तसेच इतर उष्णतेशी संबंधित आरोग्यविषयक समस्या उद्भवू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सुधारित आदेशानुसार, दि. २३ जून २०२६ पासून पुढील आदेश होईपर्यंत सर्व शाळांचे नियमित कामकाज सकाळी ७ वाजता सुरू करण्यात येणार आहे. शाळेची वेळ सकाळी ८.०० ते दुपारी १२.३० अशी निश्चित करण्यात आली असून त्यानुसार विद्यार्थ्यांचे अध्यापन व ...