पोस्ट्स

मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

आगीमध्ये आठ गाई, पंधरा शेळ्या व तब्बल दीडशे कोंबड्या ठार...

इमेज
आगीचे तांडव : गोठ्यात बांधलेल्या गाईंना आगीतून वाचवण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू    आगीमध्ये आठ गाई, पंधरा शेळ्या व तब्बल दीडशे कोंबड्या ठार धारूर, प्रतिनिधी....      धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील रेपेवाडी गावातील नरसिंह वस्ती येथे मंगळवार रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून एका वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत मोठ्या प्रमाणावर पशुधनही दगावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गोट्याला आग लागलेली असताना आत मध्ये असलेल्या पशुधनाला वाचवण्यासाठी या वृद्ध शेतकऱ्याने धाव घेतली होती... परंतु त्याचवेळी गोट्याचे छप्पर त्याच्यावर कोसळल्याने जनावरांसह या शेतकऱ्याचा देखील आगीत होरपळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रामभाऊ एकनाथ रेपे (वय ८०) हे आपल्या पत्नीसह शेतातील कोठ्यामध्ये वास्तव्यास होते. कमी उंचीच्या दगडी भिंती, गवताचे छप्पर आणि एकाच दरवाज्याची रचना असलेल्या या कोठ्याला चुलीमुळे अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  आग लागल्याचे लक्षात येताच रामभाऊ रेपे हे गोठ्यातील जनावरे सोडवण्यासाठी आत गेले. मात्...

पोलिसांनी आरोपीला घेतले घरातून ताब्यात

इमेज
२९ वर्षीय तरुणाने केला मामाच्या दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार  पोलिसांनी आरोपीला घेतले घरातून ताब्यात केज :- मामा मामीला भेटण्यासाठी आलेल्या २९ वर्षाच्या भाच्याने घरी कोणी नसताना रात्रीच्या वेळी मामाच्या दहा वर्षाच्या चिमुकलीवर मनाच्याच घरात बलात्कार केल्याची निंदनीय घटना उघडकीस आली आहे.        केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दि. ४ मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील इटकुर ता. कळंब येथील एक २९ वर्षीय तरुण हा त्याच्या आजोळी मामा-मामीकडे आला होता. रात्रीच्या वेळी त्याचे मामा व मामी हे त्यांच्या दहा वर्ष वयाच्या चिमुकल्या मुलीला भाच्या सोबत घरी घेऊ ठेवून शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याच्या गैरफायदा घेऊन त्या नराधम भाच्याने मामाच्या दहा वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. आई-वडील घरी आल्या नंतर त्या चिमुकलीने घडलेल्या सर्व प्रकारची माहिती दिली.  त्या वरून त्या नराधमा विरुद्ध युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. १२५/२०२६ भा. न्या. सं. ६४(२), (एफ) (आय) (एम), ६५(२) आणि पोक्सोचे कलम ४, ६ नुसार गुन्हा ...

आईवडील आजारी आज्जीला भेटायला जाताच केले अपहरण

इमेज
अल्पवयीन मुलीचे अपहरण आईवडील आजारी आज्जीला भेटायला जाताच केले अपहरण केज:- केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आई वडील आजारी आज्जीला भेटण्यासाठी गेले असताना एका अल्पवयीन मुलीचे आंतरजातीय विवाह करण्यासाठी अपहरण करण्यात आले आहे. केज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही शेजारच्या तालुक्याच्या ठिकाणी इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत असून तिचे आई वडील हे ४ मे रोजी सकाळी ८:०० वाजता तिच्या आजारी आजीला भेटायला तिच्या आजोळी गेले होते. ते परत घरी आल्यावर ही मुलगी गायब असल्याचे दिसून आले. कपाट उघडून पाहिले असता तिचे कपडे व बॅग दिसून आली नाही. मागील काही दिवसांपूर्वी सागर शंकर गरडे (रा. उंदरी) याच्यासोबत लग्न लावून देण्याची मागणी मुलीने आपल्या आईकडे केली होती. मात्र आईने तो वेगळ्या जातीचा असल्याचे सांगून त्याचा नाद सोडून देण्यास सांगितले होते. यावरून सागर गरडे याने मुलीला पळवून नेत तिचे अपहरण केल्याचा संशय असल्याने संबंधित मुलीच्या घरी जाऊन खात्री केली. मात्र त्याच्या घरी कोणी नसल्याचे व त्यांचे मोबाईल ही स्विच ऑफ असल्याचे दिसून आले. अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी दिल्यावरून सागर गर...

आरोपीला पोलीस कोठडी ; गुंगीचे औषध देऊन अश्लील फोटो काढले

इमेज
अंगणवाडी मदतनीस महिलेस ब्लॅकमेल करीत ११ महिन्यात वारंवार लैंगिक अत्याचार  आरोपीला पोलीस कोठडी ; गुंगीचे औषध देऊन अश्लील फोटो काढले केज :- केज तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय अंगणवाडी मदतनीस महिलेस लस्सीतून गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढला. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करीत ११ महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.   धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील संभाजीनगर भागातील विकास लक्ष्मण खाडे याची केज तालुक्यातील एका गावात कार्यरत असलेल्या ३० वर्षीय अंगणवाडी मदतनीस महिले सोबत ओळख झाली होती. त्याने या ओळखीचा फायदा घेऊन पीडित महिलेस लस्सीतून गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध झाल्या नंतर त्याने तिचे नको त्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ काढले. हे फोटो व व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची व जिवे मारण्याची धमकी देऊन विकास खाडे याने मे २०२५ ते २२ एप्रिल २०२६ या ११ महिन्याच्या कालावधीत कळंब येथील बालाजी लॉज, प्रेरणा लॉज, केज येथ...
इमेज
वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकराजा, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी                परळी प्रतिनिधी.. जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ जे व्ही जगतकर हे उपस्थित होते. तसेच   उपप्राचार्य प्रा डी के आंधळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ माधव रोडे, समन्वयक  प्रा उत्तम कांदे, कार्यालयीन अधीक्षक  सौ सुनिता धर्माधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यावेळी इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी के शेप यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य आणि कर्तृत्वावर थोडक्यात प्रकाश टाकला. त्यात त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणं घेतल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भात विशेषतः सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या करवीर संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आण...
इमेज
  बीड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात ॲड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे यांना 'किसान कृषीरत्न पुरस्कार' प्रदान बीड : ( प्रतिनिधी )  येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सोमवार, ४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:४५ वाजता हा दिमाखदार सोहळा पार पडला महाराष्ट्र शासन कृषी विभाग व किसान कृषी विकास प्रतिष्ठान, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य 'राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन २०२६' मध्ये कायदेशीर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे यांना 'किसान कृषीरत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.श्रीमती ज्योतीताई मेटे (अध्यक्षा, शिवसंग्राम) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.ॲड वांजरखेडे यांनी सर्वसामान्यांमध्ये कायदेशीर जागृती निर्माण व्हावी म्हणून  शेती असोत किंवा कौटुंबिक कायदे किंवा चेक बाऊन्स अश्या विविध कायद्यातील क्लिष्टता सोप्या भाषेत मांडून त्यांचे या विषयावरील लेख विविध वृत्तपत्रे, मासिके तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रकाशित झाले आहे तसेच कृषी विभागाच्या शेतकरी मासिकात सुद्धा त्यां...

पवित्र वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा गंभीर प्रकार.....!!!

इमेज
  परळीत धक्कादायक घटना: उपचारात अक्षम्य हलगर्जीपणा !  गर्भातील बाळाचा मृत्यू, तब्बल २२तास मृत भ्रुण ठेवले पोटात; मातेच्या जीवावर बेतले; डॉक्टरांविरोधात तक्रार परळी वैजनाथ (प्रतिनिधी):        शहरातील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपचारातील  हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर या ह्रदयद्रावक घटनेनंतरही गांभीर्य न घेता केवळ अर्थिक लाभ उठविण्याच्या उद्देशाने या गरोदर मातेच्या पोटात तब्बल २२तास मृत भ्रुण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डाॅक्टरच्या हलगर्जीने बाळ तर दगावलेच पण त्यानंतर या बाळाच्या मातेची प्रचंड हेळसांड  करुन तिच्याही जीवाशी खेळ केल्याचा अमानवी व वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा गंभीर लज्जास्पद प्रकार  या डाॅक्टरांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरां विरोधात शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून कर्तव्यात कसूर, बाळाच्या मरणास कारणीभूत व मातेच्या जीवाशी खेळण्याच्या अघोरी प्रकाराची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी करण्यात आली आह...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....