पोस्ट्स

ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

इमेज
  ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी  तुटपुंजे बिल देत शेतकऱ्यांची फसवणूक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सत्याग्रह आंदोलन सुरूच परळी / प्रतिनिधी...ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिलाची रक्कम, तोडणी मजुरी, वाहतूक व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने वारंवार निवेदने, भेटी घेऊन मागील चार महिन्यापासून प्रत्येक वेळी आश्वासनाची पोकळ बोळवण करून वेळ मारून नेत वेळ काढूपणा सुरू असल्याने शुक्रवार दि 8 रोजी ऊस उत्पादक संघर्ष समितीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले. आंदोलनाची धास्ती घेत जानेवारी महिन्यातील गाळप केलेल्या ऊस देयक पोटी 1800 देय करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरीच्या सहनशीलतेचा अंत झाला असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. ऊस गळीत हंगाम सुरू होताना ओंकार शुगर्स कडून 2950 रु भाव जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अमिष दाखवत ऊस गाळप सुरू केला. गाळप हंगामापासून ते दि 15 जानेवारी गाळप केलेल्या ऊस देयक पोटी शेतकऱ्यांना 2950 रुपयांनी ऊस देयक ओंकार साखर कारखान्याने अदा केली मात्र तदनंतर गाळप झालेल्या ऊसाची देयके 3 महिन्याचा ...
इमेज
  बीड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात ॲड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे यांना 'किसान कृषीरत्न पुरस्कार' प्रदान बीड : ( प्रतिनिधी )  येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सोमवार, ४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:४५ वाजता हा दिमाखदार सोहळा पार पडला महाराष्ट्र शासन कृषी विभाग व किसान कृषी विकास प्रतिष्ठान, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य 'राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन २०२६' मध्ये कायदेशीर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे यांना 'किसान कृषीरत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.श्रीमती ज्योतीताई मेटे (अध्यक्षा, शिवसंग्राम) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.ॲड वांजरखेडे यांनी सर्वसामान्यांमध्ये कायदेशीर जागृती निर्माण व्हावी म्हणून  शेती असोत किंवा कौटुंबिक कायदे किंवा चेक बाऊन्स अश्या विविध कायद्यातील क्लिष्टता सोप्या भाषेत मांडून त्यांचे या विषयावरील लेख विविध वृत्तपत्रे, मासिके तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रकाशित झाले आहे तसेच कृषी विभागाच्या शेतकरी मासिकात सुद्धा त्यां...

पवित्र वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा गंभीर प्रकार.....!!!

इमेज
  परळीत धक्कादायक घटना: उपचारात अक्षम्य हलगर्जीपणा !  गर्भातील बाळाचा मृत्यू, तब्बल २२तास मृत भ्रुण ठेवले पोटात; मातेच्या जीवावर बेतले; डॉक्टरांविरोधात तक्रार परळी वैजनाथ (प्रतिनिधी):        शहरातील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपचारातील  हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर या ह्रदयद्रावक घटनेनंतरही गांभीर्य न घेता केवळ अर्थिक लाभ उठविण्याच्या उद्देशाने या गरोदर मातेच्या पोटात तब्बल २२तास मृत भ्रुण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डाॅक्टरच्या हलगर्जीने बाळ तर दगावलेच पण त्यानंतर या बाळाच्या मातेची प्रचंड हेळसांड  करुन तिच्याही जीवाशी खेळ केल्याचा अमानवी व वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा गंभीर लज्जास्पद प्रकार  या डाॅक्टरांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरां विरोधात शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून कर्तव्यात कसूर, बाळाच्या मरणास कारणीभूत व मातेच्या जीवाशी खेळण्याच्या अघोरी प्रकाराची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी करण्यात आली आह...
इमेज
  चना खरेदीस २९ मे पर्यंत मुदतवाढ, धनंजय मुंडेंची मागणी केंद्र सरकारने केली पूर्ण मुदतवाढ मागितली १५ मे पर्यंत, शिवराज सिंह चौहान यांनी मुदतवाढ दिली २९ मे पर्यंत मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात चना (हरभरा) खरेदीस शासकीय खरेदी केंद्रावर १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, तसेच पोर्टलवर याबाबत नोंद करण्यात मुदतवाढ देण्यात यावी या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीस थेट केंद्र सरकारने मान्यता दिली असून शासकीय हमीभाव चना खरेदी केंद्रांवर आता २९ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  २९ एप्रिल पर्यंत नाफेड द्वारा संचालित शासकीय केंद्रांवर चना खरेदीस शासनाने दिलेली मुदत २४ एप्रिल रोजीच ऑनलाइन नोंदी बंद करून शासनाने थांबवली होती. याबाबत उत्पादक शेतकऱ्यांनी विनंती केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सह केंद्र सरकारला लेखी पत्राद्वारे विनंती करुन शासकीय केंद्रांवर किमान १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती केली होती.  केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केली असून आता चना (हरभरा) उत्पादक शेतकऱ्यांना आपला चना २९ ...

चर्चेत तोडगा नाही, आंदोलनावर ठाम

इमेज
  महादेव कोळी, मल्हार कोळी प्रमाणपत्र व जात वैधता प्रश्नासाठी  समाजबांधवांचे जिवघेण्या उन्हात तीन दिवसांपासून "अन्नत्याग आंदोलन" आंदोलक आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांमधील चर्चा निष्फळ, प्रश्न मार्गी लागेपर्यंत अन्नत्यागावर आंदोलक ठाम परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी बांधवांच्या प्रमाणपत्र व जात वैधता प्रश्नासाठी 8 समाजबांधवांनी जिवघेण्या उन्हात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जात पडताळणी अधिकारी आणि आंदोलकांमध्ये आज चर्चा झाली मात्र ती निष्फळ ठरली. तर प्रश्न मार्गी लागेपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात वेगवेगळ्या जिल्ह्यातील समाजबाधव सहभागी होत आहेत. आंदोलन सुरू असेपर्यंत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताकद दाखवून द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.      मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला सध्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्राप्त करून घेण्यासाठी जीवाचे रान करावे लागते. एव्हढे करूनही यश मिळत नाही. महादे...
इमेज
  गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांनी चारित्र्य व सद्गुणही जोपासावेत 'वैद्यनाथ' च्या गुणवंत सत्कार समारंभात श्री दत्ताप्पा इटके        परळी वैजनाथ,दि.५--         जिद्द व परिश्रमातून मिळवलेली शैक्षणिक गुणवत्ता  ही व्यक्तिमत्त्वाच्या चौफेर विकासासाठी आधारभूत मानली जाते. पण त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी आधुनिक युगात उत्तम चारित्र्य व सद्गुणांचीही जोपासना करावी, असे आवाहन जवाहर शिक्षण संस्थेचे सचिव श्री दत्ताप्पा इटके यांनी केले.            संस्थेच्या येथील  वैद्यनाथ महाविद्यालयात काल बारावी बोर्ड परीक्षेत विशेष विशेष प्राविण्य संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री इटके बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. व्ही. जगतकर हे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, उपप्राचार्य प्रा. डी. के. आंधळे , प्रा.हरीश मुंडे, प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. पी. एल. कराड, पर्यवेक्षक डॉ. नयनकुमार आचार्य, समन्वयक यु.आर. कांदे, प्रा. एम. एल. देशमुख, प्रा डॉ एम....

शाही सोहळ्याची जोरदार तयारी

इमेज
  जे. के. कन्स्ट्रक्शनचा मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहळा उद्या अनेक मान्यवरांची राहणार उपस्थितीत, सोहळ्याची जय्यत तयारी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - जाफर खान, हाजी राजा खान परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बांधकाम क्षेत्रात संपूर्ण मराठवाड्यात नामवंत म्हणून ओळख असलेल्या जे. के. कन्स्ट्रक्शनने समाजहिताचा उपक्रम हाती घेतला आहे. राजकारण, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या खान बंधूंनी मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. उद्या गुरुवार दि. 7 मे रोजी हा शाही विवाह सोहळा संपन्न होत असुन त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याला नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जे. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक जाफर खान, उपनगराध्यक्ष हाजी राजा खान यांनी केले आहे.         सामाजिक भान ठेवून, समाजाचे देणे लागतो या भावनेतून जे. के. कंट्रक्शन यांच्या वतीने गुरुवार दि. 7 मे रोजी मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मलकापूर रोडवरील जे. के. फंक्शन हॉल येथे सकाळी 11 वाजता हा सामूहिक विवाह सोहळा थाटात आणि उत्साहात संपन्न...
इमेज
  संघर्षातून यशाकडे: भांडी-धुणी करणाऱ्या माऊलीच्या लेकीची १२ वीच्या परीक्षेत मोठी झेप! परळी वैजनाथ,प्रतिनिधी... आईने दुसऱ्यांच्या घरी भांडी-धुणी करून काबाडकष्ट केले आणि मुलीनेही त्या कष्टाचे चीज करत १२ वीच्या परीक्षेत तब्बल ७८% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. परिस्थिती बेताची असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या तनुजा रणदिवे या मुलीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तनुजा ची आई पद्मिन तानाजी रणदिवे  गेल्या अनेक वर्षांपासून गणेशपार भागात धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पतीच्या निधनानंतर व आर्थिक स्थिती हलाखीची असताना घराची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर होती. "माझ्या वाट्याला आलेले कष्ट माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नयेत," याच एका ध्येयाने या माऊलीने दिवसरात्र काम केले. परळी येथे हनुमान नगर येथे किरायाच्या घरात राहणाऱ्या व घरात अभ्यासासाठी वेगळी खोली नाही की महागडे क्लास लावण्याची सोय नव्हती. आई कामावर गेल्यावर घरची कामे आटपून ही मुलगी अभ्यासाला बसायची. रात्री उशिरा पर्यंत तिने चिकाटीने अभ्यास केला. कष्टाचे मोल जाणणाऱ्या तनुजाने अभ्यासात कधीही ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....