जीवाची लाही लाही....
परळी शहरात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सियसवर उन्हाच्या तडाख्याने दुपारी रस्ते सामसूम; परळी शहरात सुर्य ओकत आहे आग !! परळी/संतोष जुजगर परळी वैजनाथ तालुक्यात सध्या लग्नसराई चालू आहे.लग्नसराईच्या दिवसांमध्ये उन्हाची तिव्रता अधिक वाढू लागली आहे.लग्न कार्यानिमित्ताने खरेदी साठी बाजारपेठेकडे ग्रामीण भागातील नागरिक धाव घेतांना दिसत आहे. लग्नाचे कपडे, किराणा, दाग-दागिने खरेदीवर विशेष जोर देतं आहे.त्यातच नागरिकांच्या जिवाची उन्हामुळे लाही-लाही होतं आहे.यामुळे उन्हापासुन घामाघूम झालेले नागरीक, महिला, वयोवृद्ध, व बच्चे कंपनी थोडासा उन्हापासुन दिलासा मिळावा यासाठी शहरातील शितपेय व ऊसाच्या रसावर ताव मारत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पारा प्रथमच 39 अंश सेल्सियसवर पोहोचला. उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारनंतर परळी शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. लग्नसराई असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरात विविध लग्नसामग्री खरेदी साठी येतं आहे.लग्नसराई महिना असल्याने नागरिक लग्नसामग्रीसह उन्हापासुन बचावासाठी टोप्या, रुमाल आदी खरेदी करतं आहे.उन्हाची तिव्रता असल्यामुळे शहरातील विविध दुकानंदार उन्हाच्या ...