पोस्ट्स

इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळेची विद्यार्थिनी नगमा मुख्तार खान महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊन महसूल सहाय्यक पदी निवड

इमेज
 डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळा परळी वै. दहावीच्या परीक्षेस घवघवीत यश उर्दू माध्यमातून तालुक्यात प्रथम.96.96%      डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळेची विद्यार्थिनी नगमा मुख्तार खान महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊन महसूल सहाय्यक पदी निवड  परळी वैजनाथ - परळी वैजनाथ येथील डॉ. झाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी, जिल्हा बीड संचलित डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये 96.96 टक्के निकालासह परळी तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. उर्दू माध्यमातून विद्यालयाने हे यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. तसेच बारावी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये विज्ञान शाखेचा 98 टक्के निकाल लागला असून, विद्यालयाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. दहावीच्या परीक्षेत शेख फायजा गयास हिने 88 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम, तर शेख इशरा अनवर हिने 81 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. बारावीतील गुणवंत विद्यार्थी विज्ञान शाखेत सय्यदा आयेशा सिद्दीखा अश्फाक...
इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...
इमेज
  घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमाई घरकुल योजनेंतर्गत १५४ लाभार्थ्यांना १ कोटी १ लाख ८१ हजार २५० रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या परळी नगर परिषदेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला रुपया देखील मिळाला नसून, नगर परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तीव्र जाब विचारला आहे. प्रसिद्धीचा स्टंट, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित महादेव गंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांद्वारे केला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या हाती निराशाच आली. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थी अद्यापही पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहे...
इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

इमेज
  ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी  तुटपुंजे बिल देत शेतकऱ्यांची फसवणूक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सत्याग्रह आंदोलन सुरूच परळी / प्रतिनिधी...ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिलाची रक्कम, तोडणी मजुरी, वाहतूक व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने वारंवार निवेदने, भेटी घेऊन मागील चार महिन्यापासून प्रत्येक वेळी आश्वासनाची पोकळ बोळवण करून वेळ मारून नेत वेळ काढूपणा सुरू असल्याने शुक्रवार दि 8 रोजी ऊस उत्पादक संघर्ष समितीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले. आंदोलनाची धास्ती घेत जानेवारी महिन्यातील गाळप केलेल्या ऊस देयक पोटी 1800 देय करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरीच्या सहनशीलतेचा अंत झाला असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. ऊस गळीत हंगाम सुरू होताना ओंकार शुगर्स कडून 2950 रु भाव जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अमिष दाखवत ऊस गाळप सुरू केला. गाळप हंगामापासून ते दि 15 जानेवारी गाळप केलेल्या ऊस देयक पोटी शेतकऱ्यांना 2950 रुपयांनी ऊस देयक ओंकार साखर कारखान्याने अदा केली मात्र तदनंतर गाळप झालेल्या ऊसाची देयके 3 महिन्याचा ...

घोटाळ्याचा तपासाकडे राज्याचे लक्ष !

इमेज
  तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकला आठ दिवसाची पोलीस कोठडी गायब फाईल्स, लॅपटॉप आणि आवाज नमुन्यासाठी मागितली पीसीआर  बीड, प्रतिनिधी... बीड जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांच्या भूसंपादन मावेजा वाटप घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. महसूल प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या या बहुचर्चित घोटाळ्याच्या तपासाला आता वेग येण्याची चिन्हे आहेत. अविनाश पाठक यांना गुरुवारी बीड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करत गंभीर स्वरूपाची माहिती सादर केली. आरोपीकडून महत्त्वाचा लॅपटॉप जप्त करायचा असून कॉल रेकॉर्डिंग साठी आवाजाचे नमुने घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच लातूर, पुणे आणि मुंबई येथील आरोपीच्या तीन निवासस्थानी झडती घेण्याची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या घोटाळ्याशी संबंधित १५४ फाईलपैकी १४८ फाईल्स मिळाल्या असून सहा महत्त्वाच्या फाईल्स अद्यापही गायब असल्याचे तपास अ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....