पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार - नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी
एल-निनो परिस्थितीची शक्यता : परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घेतला आढावा पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार - नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी परळी शहराच्या पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करू- पाणीपुरवठा सभापती सौ.जयश्री गित्ते परळी वैजनाथ, दि. १३ जून — राज्यात यंदा एल-निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत धरणे, तलाव व इतर जलस्रोतां मधील पाणीसाठा यांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या अनुषंगाने आज परळी नगरीच्या नगराध्यक्ष सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी आणि पाणीपुरवठा सभापती सौ. जयश्रीताई रविंद्र गित्ते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वाण प्रकल्पावर जाऊन पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एल-निनोचा परिणाम राहण्याची शक्य...