आईचा चारधाम दर्शनाचा संकल्प लेक करतेयं पूर्ण!



ना. पंकजाताई मुंडेंनी आई आणि बहिण प्रीतमताईंसह द्वारकेत घेतले दर्शन

देशातील एकमेव गो हाॅस्पीटलला दिली भेट ; वृक्षारोपणही केले

मुंबई दि. ११ --

चारधाम यात्रेचे दर्शन घडवून आणण्याचा आईसाठी केलेला संकल्प राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे पूर्ण करत आहेत. आज त्यांनी आई प्रज्ञाताई व बहिण माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्यासह द्वारकेत भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. याठिकाणी देशातील एकमेव असलेल्या गो हॉस्पिटलला भेट दिली तसेच पंतप्रधान मोदींच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल वृक्षारोपणही केले.

   यासंदर्भात एक पोस्ट करत ना. पंकजाताईंनी आईचा चारधाम करण्याचा संकल्प पूर्ण करत असल्याचे म्हटले आहे. एक दिवस मिळाला की आई आणि बहिण प्रीतमताईंसह आम्ही निघालो.आज देवभूमी द्वारका येथे श्री द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी द्वारकाधीश मंदिर ट्रस्ट आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. काही दिवसांपूर्वीच ना. पंकजाताईंनी आईला घेऊन बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीला जाऊन दर्शन घेतले होते.

गो हॉस्पिटलला भेट ; वृक्षारोपणही केले

भारतातील एकमेव आएसओ मानांकित गोमातेचे रुग्णालय असलेल्या 'द्वारकाधीश गो हॉस्पिटल' येथे ना. पंकजाताईंनी भेट देऊन पाहणी केली. गोसेवेचे हे अद्ययावत कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष रामजीभाई मैजीठीया, अशोक राजा व इतर सहकारी उपस्थित होते.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश १२ वर्षे अविरतपणे विकासाच्या वाटेवर अग्रेसर आहे. देशातील सर्वात जास्त काळ पंतप्रधान म्हणून नेतृत्व करण्याचा ऐतिहासिक विक्रम त्यांनी कालच केला. याच औचित्याने आज देवभूमी द्वारका येथे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत ना. पंकजाताईंनी वृक्षारोपण केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!