बूथ मॅपिंग शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या बीएलए -२ कार्यकर्त्यांचा केला सत्कार
बूथ मजबूत तर यश निश्चित; एसआयआर मोहिमेत शंभर टक्के योगदान द्या ना. पंकजा मुंडे यांनी घेतला परळी मतदारसंघातील बुथचा आढावा बूथ मॅपिंग शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या बीएलए -२ कार्यकर्त्यांचा केला सत्कार परळी वैजनाथ, दि. १६ -- बूथ हा पक्ष संघटनेचा कणा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथशी सातत्याने संपर्क ठेवून जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात. शंभर टक्के बूथ मॅपिंग पूर्ण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेचा विश्वास हीच भाजपची खरी ताकद आहे. सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत सर्वांनी आपापल्या बुथची शंभर टक्के मॅपिंग करावी आणि आपल्या संघटनात्मक कामासह राष्ट्रीय कर्तव्य बजवावे असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ येथे भाजपाच्या बी एल ए- दोन म्हणून जबाबदारी असलेल्या ३६२ कार्यकर्त्यांची ना.पंकजा...