या भव्य मोफत आरोग्य शिबिरामध्ये तीन महत्वाच्या शिबिरांचा समावेश आहे.....
आ. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त १८०० रु किमतीच्या मोफत रक्त तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा-डॉ.संतोष मुंडे
यासोबतच दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व तक्रार निवारण अभियानाचा होणार प्रारंभ
परळी (प्रतिनिधी):दिनांक १३ जुलै
आ.धनंजय मुंडे यांच्या वाढिवसानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी १८०० रु किंमतीच्या भव्य मोफत रक्त तपासणी आणि कॉम्पुटराईजड नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक १५ जुलै सकाळी १०.०० ते १.०० वाजेपर्यंत श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे करण्यात आले आहे.
त्याच बरोबर दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व तक्रार निवारणअभियानाची मंगल सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती दिव्यांग कल्याण अभियान मंत्रालयाचे उपाध्यक्ष व या शिबिराचे मुख्य आयोजक डॉ.संतोष मुंडे यांनी दिली.आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगाचे कैवारी म्हणून ओळख असणारे तसेच विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध आरोग्य शिबिरे व दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवणारे त्याचबरोबर प्रसंगी दिव्यांगाच्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरून सरकार दरबारी आंदोलन करणारे दिव्यांग कल्याण अभियान मंत्रालय उपाध्यक्ष अध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या अथक प्रयत्नातून या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
अशा या भव्य मोफत आरोग्य शिबिरामध्ये तीन महत्वाच्या शिबिरांचा समावेश आहे.
१.सर्वसामान्य नागरिकांसाठी तब्बल १८०० रुपये किंमतीच्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या रक्त तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत ज्यामध्ये
संपूर्ण रक्तगणना (CBC), रक्तातील तीन महिण्याची साखर(HbA1c),थायरॉईड प्रोफाइल, व्हिटॅमिन डी,व्हिटॅमिन बी१२,सिरम कॅल्शियम या अतिशय महत्वाच्या रक्त तपासण्या मोफत करून घेण्यात येणार आहेत.
२.सर्वसामान्य जनतेसाठी मोफत नेत्र रोग तपासणी शिबिराचे आयोजन ज्यामध्ये डोळ्यांच्या विविध आजारांचे योग्य निदान होण्यासाठी शिबिरातील सहभागी रुग्णांच्या डोळ्यांची मोफत कॉम्पुटराईजड तपासणी केली जाईल.या नेत्र तपासणी शिबिरासाठी अंबाजोगाईच्या प्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉ नम्रता ढवारे(eye surgen)उपस्थिती राहणार आहेत.
३.दिव्यांग,विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व तक्रार निवारण अभियानाचा प्रारंभ आज पासून होणार आहे ज्या अंतर्गत तालुक्यातील आणि जिल्यातील प्रत्येक गावात आठवड्यातून दोन दिवस दिव्यांग,विधवा,आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध समस्येचे निराकरण करण्यासाठी हे तक्रार निवारण अभियान अविरत कार्य करणार आहे जेणे करून कोणत्याही दिव्यांगाला,ज्येष्ठ नागरिकाला,आणि विधवा भगिनींना त्यांच्या कोणत्याही प्रश्नांसाठी कुठेही जायची गरज पडणार नाही त्यांच्या गावात हे अभियान त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द असेल.
अशी सखोल माहिती या शिबिराचे मुख्य आयोजक दिव्यांग कल्याण अभियान मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी दिली तसेच परळी तालुका व परिसरातील सर्व नागरिकांनी, दिव्यांग बांधव,ज्येष्ठ नागरिक ,विधवा भगिनी यांनी या भव्य मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा