बूथ मॅपिंग शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या बीएलए -२ कार्यकर्त्यांचा केला सत्कार
बूथ मजबूत तर यश निश्चित; एसआयआर मोहिमेत शंभर टक्के योगदान द्या
ना. पंकजा मुंडे यांनी घेतला परळी मतदारसंघातील बुथचा आढावा
बूथ मॅपिंग शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या बीएलए -२ कार्यकर्त्यांचा केला सत्कार
परळी वैजनाथ, दि. १६ --
बूथ हा पक्ष संघटनेचा कणा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथशी सातत्याने संपर्क ठेवून जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात. शंभर टक्के बूथ मॅपिंग पूर्ण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेचा विश्वास हीच भाजपची खरी ताकद आहे. सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत सर्वांनी आपापल्या बुथची शंभर टक्के मॅपिंग करावी आणि आपल्या संघटनात्मक कामासह राष्ट्रीय कर्तव्य बजवावे असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले.
सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ येथे भाजपाच्या बी एल ए- दोन म्हणून जबाबदारी असलेल्या ३६२ कार्यकर्त्यांची ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीत एसआयआर मोहिमे अंतर्गत झालेल्या कामाचा, याचबरोबर प्रत्येक बूथ निहाय संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी नियोजन, बूथ व्यवस्थापन आणि पक्षाच्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा सत्कार
यावेळी ना पंकजाताई मुंडे यांचा हस्ते 100 % टक्के मॅपिंग पूर्ण केल्याबद्दल दशरथ मुरकुटे, गोविंद कांगणे (मुरकुटवाडी), डॉ. भिमराव माळवे (वालेवाडी), यशवंत फड (पिंपरी), अण्णासाहेब डिघोळे (माळहिवरा), संतोष सोळंके, अशोक मुसळे (नागापुर) यांचा सत्कार करण्यात आला.
वाढदिवसाबद्दल साडी चोळी देऊन सत्कार
दरम्यान, यावेळी ना .पंकजाताई मुंडे यांच्या 26 जुलै रोजी असलेल्या आगामी वाढदिवसानिमित्त परळी मतदार संघाच्या वतीने पंकजाताईंचे अभिष्टचिंतन करण्यात आले. या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी साडी चोळी देऊन हृदय सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीएलए -१ विधानसभा प्रमुख, बांधकाम सभापती तथा गटनेते प्रा. पवन मुंडे यांनी केले. यावेळी त्यांनी एस आय आर मोहिमेत आत्तापर्यंत झालेल्या कामाचा व आगामी नियोजन याबाबत माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली. व्यासपीठावर भाजपाचे पूर्व मंडळ अध्यक्ष राजेश गीते, पश्चिम मंडळ अध्यक्ष वसंत निर्मळ-पाटील, अंबाजोगाई मंडळ अध्यक्ष नाना भगत, परळी शहर मंडळ अध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टी, जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके, जुगलकिशोर लोहिया, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, श्रीराम मुंडे, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, व्हाईस चेअरमन रमेश कराड, संचालक विजयकुमार वाकेकर, संदीप लाहोटी, अनिल तांदळे, महेश्वर निर्मळे, शांतीलाल जैन, निळकंठ चाटे, गणेश कराड, वैजनाथ जगतकर, डाॅ. शालिनीताई कराड, सुचिता पोखरकर, शेख अब्दुल करीम, प्रा. बिभीषण फड आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानोबा सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन रवि कांदे यांनी केले.
••••

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा