पोस्ट्स

मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन....

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान:  ३० जुलै रोजी परळी वैजनाथ येथे समाधान शिबिर बीड दि. 29 ( प्रतिनिधी ): उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुक्ताई लॉन्स, इटके कॉर्नर, शासकीय विश्रामगृहाजवळ, परळी वैजनाथ येथे होणार आहे. या शिबिरास आमदार धनंजय मुंडे, मंत्री पंकजाताई मुंडे, बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विनोद रनवरे, तहसीलदार विलास तरंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिबिरामध्ये नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना दाखले, मंजुरीपत्रे तसेच आर्थिक धनादेशांचे मान्यवरांच्या हस्ते...

आपल्या गुरूंना अभिमान वाटेल असे कार्य करावे.....

इमेज
माझे बाबाच माझे गुरु; त्यांच्या संस्कारांतूनच लोकसेवेसाठी समर्पित जीवनाचा संकल्प – पंकजा मुंडे गुरुपौर्णिमेनिमित्त पंकजाताई मुंडे यांचे लोकनेत्याला मनोभावे नमन! परळी वैजनाथ | प्रतिनिधी       गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी नागरिकांना शुभेच्छा देत गुरूंच्या ऋणाची जाणीव ठेवून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व असून जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. माझे बाबा हेच माझे गुरु असुन त्यांच्या संस्कारांतूनच लोकसेवेसाठी समर्पित जीवनाचा संकल्प असल्याची दृढ भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.       गुरुपौर्णिमेनिमित्त पंकजाताई मुंडे यांनी आपले पिता - नेता आणि गुरु लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना मनोभावे नमन केले. याप्रसंगी सर्वांना शुभेच्छा देत गुरूंच्या ऋणाची महती सांगताना त्यांनी सर्वांना महत्त्वपूर्ण संदेश दिला. यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, आपल्याला जीवनात उभे राहाय...

अतिवृष्टीसदृश पावसाच्या घटना घडण्याची शक्यता....

इमेज
29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई, दि. 28 जुलै: बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेश मध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता आहे. या काळात अतिवृष्टीसदृश पावसाच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होणे, वाहतुकीवर परिणाम होणे, तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.  सध्याच्या हवामान अंदाजानुसार, 29 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यत...

तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात....

इमेज
मोकाट जनावरांचा शहरात वाहतूकीना अडथळा; परळी नगरपालिकेचा कोंडवाडा नेमका कुठे?  - दीपक देशमुख यांचा सवाल परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक परिसरासह प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे बिनधास्तपणे वावरत असल्याने नागरिक, पदचारी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर परळी नगरपालिकेच्या मोकाट जनावरांसाठीच्या कोंडवाड्याच्या कार्यक्षमतेवर माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम काही दिवस चालविण्यात आली; मात्र त्यातून अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत. त्यानंतर शहरात मोकाट गायी, बैल व इतर जनावरांचा वावर वाढला असून राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकासह मुख्य मार्गांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर पदचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिकेने मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा सुरू केला आहे का, की तो केवळ कागदोपत्रीच आहे, असा सवाल करत देशमुख यांनी या कामावर झालेल्या खर्चाची आ...

स्वप्न मोठी पहा..." - प्रा. पवनकुमार मुंडे यांचा कानमंत्र

इमेज
नव्या वह्या हाती मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद! ना. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदपवाडी शाळेत शालेय साहित्य वाटप  परळी वैजनाथ (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंदपवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन कोऱ्याकरकरीत वह्या हाती मिळताच चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो अवर्णनीय आनंद ओसंडून वाहत होता, त्याने उपस्थित सर्वांचीच मने जिंकून घेतली. या सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रमासाठी परळी नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रा. पवनकुमार मुंडे, रवी कांदे  दिलीप नेहरकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष  केशवराव मुंडे, गावच्या पोलीस पाटील सौ. मनीषा मुंडे, माजी सरपंच  भागवतराव मुंडे, शिक्षणप्रेमी नागरिक सतीश मुंडे आणि शाळेचे मुख्याध्यापक  सुभाष केंद्रे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. " स्वप्न मोठी पहा..." - प्रा. पवनकुमार मुंडे यांचा कानमंत्र कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. पवनकुमार मुंडे ...
इमेज
  परळीत गांजाच्या पुड्या विकणाऱ्या  एकाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल: तेरा हजाराचा गांजा हस्तगत परळी वैजनाथ | प्रतिनिधी       परळी शहरातील  वाल्मीक नगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत १३ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त केला असून  परळीत गांजाच्या पुड्या विकणाऱ्या एका आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.२५ वाजण्याच्या सुमारास वाल्मीक नगर, एकमीनार चौक परिसरातील आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. या कारवाईत गुड्डू उर्फ छोटूमियाँ तांबोळी (वय ३०, रा. वाल्मीक नगर, एकमीनार चौक, परळी वैजनाथ) याच्या ताब्यातून ८८ ग्रॅम वजनाचा हिरवट- काळपट रंगाचा, गांजासदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला गांजा २७ छोट्या पुड्यांमध्ये विक्रीसाठी तयार ठेवण्यात आला होता. प्रत्येकी ५०० रुपये किंमतीप्रमाणे या अमली पदार्थाची एकूण किंमत १३ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ...
इमेज
  परळीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; दोन दिवसांपुर्वी पोक्सोअंतर्गत झाला होता गुन्हा दाखल परळी वैजनाथ | प्रतिनिधी...       तालुक्यातील दादाहरी वाडगाव  येथील एका २० वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज (दि.२८) रोजी सकाळी उघडकीस आला.परळीतील मेरुगिरी डोंगर परिसरात गळफास घेऊन  त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.दरम्यान मयत युवकाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन दिवसांपुर्वी पोक्सोअंतर्गत  गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तो फरार होता.यातच त्याची आत्महत्या समोर आल्याने या प्रकरणाची गंभीर चर्चा सुरू आहे.       दादाहरी वाडगाव  येथील आकाश राम खाटीक वय २० वर्षे या युवकाने आज सकाळी परळी वैजनाथ येथील मेरुगिरी डोंगरावरील आयटीआय महाविद्यालय परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, दादाहरी वाडगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून विळ...