परळीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; दोन दिवसांपुर्वी पोक्सोअंतर्गत झाला होता गुन्हा दाखल
परळी वैजनाथ | प्रतिनिधी...
तालुक्यातील दादाहरी वाडगाव येथील एका २० वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज (दि.२८) रोजी सकाळी उघडकीस आला.परळीतील मेरुगिरी डोंगर परिसरात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.दरम्यान मयत युवकाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन दिवसांपुर्वी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तो फरार होता.यातच त्याची आत्महत्या समोर आल्याने या प्रकरणाची गंभीर चर्चा सुरू आहे.
दादाहरी वाडगाव येथील आकाश राम खाटीक वय २० वर्षे या युवकाने आज सकाळी परळी वैजनाथ येथील मेरुगिरी डोंगरावरील आयटीआय महाविद्यालय परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, दादाहरी वाडगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून विळ्याने जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल झालेला होता. घटनेनंतर हा आरोपी फरार झाला होता.यातच त्याच्या आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीवरील हल्ला आणि त्यानंतर संबंधित युवकाने केलेल्या आत्महत्येमुळे या प्रकरणाची गंभीर चर्चा सुरू आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा