प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:शेतकरी कायद्याविरोधात परळीत कडकडीत बंद; विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केले बंदचे आवाहन

    शेतकरी कायद्याविरोधात परळीत कडकडीत बंद; विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केले बंदचे आवाहन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

    केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात परळीत महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आले. यावेळी माकप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित आघाडी सह आंदोलनाला पाठींबा असणाऱ्या विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी 8 वा शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातून निदर्शन करण्यात आले.




केंद्र सरकारने जाचक असलेला शेतकरी कायदा रद्द करावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने परळी बंदची हाक देण्यात आली आहे. जाचक कायदा रद्द करावा, केंद्र सरकार मुर्दाबाद अशा घोषणांनी परळी शहर दुमदुमून गेले. यावेळी माकपचे पी.एस.घाडगे, पांडुरंग राठोड,पी.एस.नागरगोजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाजीराव धर्माधिकारी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे, काँग्रेसचे बाबु नंबरदार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या