इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS: न्यू हायस्कूल कॉलेज येथे परिसर स्वच्छता अभियान

 न्यू हायस्कूल कॉलेज येथे परिसर स्वच्छता अभियान 




परळी (वै.) प्रतिनिधी :- शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त (दि.२०) डिसेंबर मंगळवार रोजी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

                     राष्ट्रसंत संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य सुनील लोमटे यांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून संत गाडगे महाराज यांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अंकुश वाघमारे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या