इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पंढरपूर, काशीच्या धर्तीवर परळी वैद्यनाथ कॉरिडॉला मान्यता द्या - धनंजय मुंडेंची विधानसभेत मागणी*

 श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पंढरपूर, काशीच्या धर्तीवर परळी वैद्यनाथ कॉरिडॉला मान्यता द्या - धनंजय मुंडेंची विधानसभेत मागणी*




*बारा ज्योतिर्लिंगांच्या यादीत ज्योतिर्लिंग म्हणून परळीचे वैद्यनाथांचे नावच कायम रेकॉर्डला असावे मुंडेंनी विधानसभेत निक्षून सांगितले*


नागपूर (दि. 21) - परळी शहरातील श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र हे महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, दरवर्षी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात, त्यांना आवश्यक पूरक सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच या अध्यात्मिक स्थळाचे जतन व्हावे व शहरासह मंदिर व परिसराचा कायापालट व्हावा यादृष्टीने पंढरपूर, काशी विश्वेश्वर, उज्जैन महाकाल या धर्तीवर परळी वैद्यनाथ कॉरिडॉर विकसित करण्यास राज्य सरकारने मान्यता द्यावी, अशी मागणी आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली. 


नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्या वरील चर्चे दरम्यान धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.


परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 वे ज्योतिर्लिंग असून याचे धार्मिक महत्व अनन्यसाधारण आहे मात्र मागील काही वर्षांत वैद्यनाथ धामचे नाव 12 ज्योतिर्लिंग स्थळांच्या यादी मध्ये दाखवण्यात येत असून, वैद्यनाथ धामचे नाव वगळून 12 ज्योतिर्लिंगांच्या यादीत परळीच्या प्रभू वैद्यनाथांचेच नाव पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून सर्वत्र रेकॉर्डला कायम करावे, असेही धनंजय मुंडे यांनी विधानसभेत निक्षून सांगितले.


दरम्यान परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या 133.58 कोटी रुपयांचा आराखडा महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेला आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात भव्य भक्त निवास व अन्य विकासकामे सध्या सुरू आहेत.


तसेच पुढील टप्प्यातील कामांसाठी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखाड्यातील पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, याबद्दल धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारचे आभार मानले.


परळी हे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे शहर असून, महाशिवरात्री सह विविध निमित्ताने लाखो भाविक देशभरातून येथे दर्शनासाठी  येत असतात, त्यामुळे भाविकांना पूरक सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच काशी व उज्जैन कॉरिडॉर च्या धर्तीवर वैद्यनाथ मंदिर, परिसर व परळी शहराचा सर्वांगीन विकास करण्यासाठी परळी वैद्यनाथ कॉरिडॉरला मान्यता देण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.


राज्य सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी यावर उत्तर देताना राज्य सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करेल, असे आश्वासन यावेळी विधानसभेत बोलताना दिले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या