MB NEWS:पंकजाताईंनी यापूर्वी दोन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटून निधी देण्याचा केला होता आग्रह

 पंकजाताई मुंडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश



वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयाला राज्य सरकारने दिली चालना ; २० कोटी रूपये मंजूर


*पंकजाताईंनी यापूर्वी दोन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटून निधी देण्याचा केला होता आग्रह*


परळी वैजनाथ ।दिनांक २१।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्री असताना मंजूर करून आणलेल्या १३३ कोटीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयास राज्य सरकारने चालना दिली असून यासाठी २० कोटी रूपये पुरवणी मागणी अंतर्गत मंजूर केले आहेत. यासंदर्भात पंकजाताईंनी मुख्यमंत्र्यांना दोन वेळा प्रत्यक्ष भेटून निधी देण्याची आग्रही मागणी केली होती.


  पंकजाताई मुंडे बीडच्या पालकमंत्री असताना  सुधीर मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री होते.  पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा ध्यास घेतला होता, त्यांनी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करून तीर्थक्षेत्र विकासासाठी १३३ कोटी ५८ लक्ष रुपयाचा विकास आराखडा मंजूर करून घेतला होता.  या आराखड्यातील कामांसाठी त्यावेळी ३५ कोटी रुपयांचा निधी देखील पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध झाला होता.  याच निधीतून २० कोटीच्या भक्त निवासाचे बांधकाम  सध्या  प्रगतीपथावर आहे. त्यानंतर निवडणूका झाल्या आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले, मात्र  मागील पालकमंत्र्यांनी याकडे साफ  दुर्लक्ष केल्यामुळे निधी मिळाला नव्हता परिणामी हा आराखडा रखडला होता.


Click:

■ *बीड जिल्हा -भाजपचाच बालेकिल्ला|जनतेने सिद्ध केले | पंकजा मुंडे म्हणाल्या यापुढे गुलाल आपलाच....!* _MB NEWS ला Subscribe, like, share, comments नक्की करा._






*दोन वेळा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट*

-------------

हा आराखडा जशास तसा  मंजूर करावा आणि त्याला गती द्यावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी यावर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून केली होती. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने सरकारने या मागणीची दखल घेऊन पुरवणी मागणीद्वारे या आराखडय़ासाठी २० कोटी रूपये मंजूर केले आहेत. दरम्यान हा निधी मंजूर करून वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाला चालना दिल्याबद्दल पंकजाताईंनी मुख्यमंत्री शिंदे व उप मुख्यमंत्री फडणवीस या दोघांचेही आभार मानले आहेत. 

••••







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार