इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:काँग्रेस परळी शहर कार्याध्यक्षपदी ॲड. शशीशेखर चौधरी

 काँग्रेस परळी शहर कार्याध्यक्षपदी ॲड. शशीशेखर चौधरी



परळी ,शहर काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी येथील गणेशपार विभागातील चे कार्यकर्ते ऍड शशीशेखर चौधरी यांची  शुक्रवारी परळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादुर यांनी एका पत्रा द्वारे नियुक्ती केली.                                   

        येथील शहर काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस व जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख , सय्यद हनिफ उर्फ बहादुर ,प्रदेश चिटणीस ऍड अनिल मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऍड शशीशेखर चौधरी यांचा सत्कार करून  शहर काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदाच्या नियुक्ती चे पत्र देण्यात आले.व त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले, काँग्रेस पक्षाची विचारधारा नागरिकापर्यंत पोहोचून पक्षाचे कार्य वाढविण्यासाठी मदत करणार असल्याचे नूतन कार्याध्यक्ष शशीशेखर  चौधरी यांनी सांगितले,दरम्यान काँग्रेसचे परळी विधानसभा मतदार संघ अध्यक्ष, रणजित देशमुख,  ऍड शशीशेखर चौधरी यांचे जिल्हा सरचिटणीस ऍड  प्रकाश मुंडे, समंदरलाला पठाण , यांच्या इतर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.



Advertise 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या