इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:प्रेम भक्ती साधना केंद्र येथे परळी महात्म्य सांगता उत्साहात

 प्रेम भक्ती साधना केंद्र येथे परळी महात्म्य सांगता उत्साहात 


परळी : शहरातील क्रीती नगर भागातील प्रेम भक्ती साधना केंद्र येथे गेल्या चाळीस दिवसापासून सुरू असलेल्या परळी महात्म्य पारायण या धार्मिक कार्यक्रमाची मोठ्या उत्साहात सांगता कार्यक्रम पार पडला. 

ग्रंथकार ह.भ.प राजाभाऊ गंगाधर गरड व ह.भ.प सौ.शिंदेताई यांच्या मधुर वाणीतून परळी महात्म्य या ग्रंथाचे वाचन करण्यात आले, या भागातील भावीक भक्तांनी या पारायण सोहळ्यात मोठया संख्येने भाग घेतला.


 यावेळी ज्ञनप्रबोधिनी हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे यांना दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने परळी भुषण पुरस्कार सन्मानित केल्याबद्दल त्यांचा प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने रमेश मुंडीक (धारासुरकर) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर पत्रकार मित्र महादेव गित्ते, धनंजय अरबुने, संपादक बालकिशन सोनी, सामजिक कार्यकर्ते सचिन भांडे, सर्व पत्रकार मित्र मंडळ,अँड बाळू शहाणे, यूवा कार्यकर्ते विजय दहीवाळ, परळी वैजनाथ सराफ मार्केट असोसिएशन अध्यक्ष, श्री राहुल टाक, संपादक,पत्रकार, मित्र मंडळ परिवार, सर्व सुवर्णकार समाज बांधव संत शिरोमणी नरहरी महाराज भजनी मंडळ, संत नामदेव महाराज भजनी मंडळ, ह. भ.प कंकाळताई, होळंबेताई, गित्तेताई,इंगळेताई, वाळकेताई उपस्थित होते. सर्वांचे सत्कार प्रेम भक्ति साधना केंद्रातर्फे करण्यात आले. आलेल्या सर्व सुवर्णकार समाज बांधव, सामिजक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, सर्व मित्र परिवार, प्रेम भक्ति साधना केंद्रातील साधक, कीर्ति नगर येथील सर्व मित्र मंडळ परिवार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या