इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:● आ.धनंजय मुंडेंमुळे हजारो परिवारांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार:रमाई घरकुल योजनेचा १० कोटी २२ लक्ष रुपये निधी न.प.ला प्राप्त - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

 ● आ.धनंजय मुंडेंमुळे हजारो परिवारांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार:रमाई घरकुल योजनेचा १० कोटी २२ लक्ष रुपये निधी न.प.ला प्राप्त - बाजीराव भैय्या धर्माधिकारी



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      रमाई घरकुल योजनेच्या ३३४ व १०८ या मंजूर विकास आराखड्याचे १० कोटी २२ लक्ष रुपये निधी न.प.ला प्राप्त झाले आहेत.परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते विकासपुरुष आ.धनंजय मुंडे यांच्यामुळे हजारो परिवारांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

          ३३४ व १०८ या मंजूर विकास आराखड्याचे १० कोटी २२ लक्ष रुपये निधी नगर परिषदेला प्राप्त झाला आहे.राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या सहकार्यातून त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेले "रमाई घरकुल योजनेचे" मंजूर डीपीआर चे १० कोटी २२ लक्ष रुपये निधी नगर परिषदेस प्राप्त झाला.हजारो परिवारांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणारे विकासपुरुष आ.धनंजय मुंडे यांच्यामुळे हे घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. परळी शहर व मतदारसंघातील विविध विकासकामांचा ध्यास घेऊन आ.आ.धनंजय मुंडे यांनी सर्वच विकासकामांना भरभरून निधी उपलब्ध करून दिला आहे.परळी शहरातील महत्त्वपूर्ण असा घरकुलांचा विषय मार्गी लावून हजारो परिवारांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या अनुषंगानेच राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना आ.धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात मंजूर"रमाई घरकुल योजनेचा" डीपीआर मंजूर करण्यात आला. या मंजूरडीपीआर चे १० कोटी २२ लक्ष रुपये निधी नगर परिषदेस प्राप्त झाले. याबद्दल तमाम परळीकरांच्या वतीने आ.धनंजय मुंडे यांचेमाजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या